esakal | शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर मिळणार शेती उपयोगी अवजारे
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर मिळणार शेती उपयोगी अवजारे

शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर मिळणार शेती उपयोगी अवजारे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ३१ जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर योजनांमधून शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर शेती उपयोगी अवजारे व साहित्य मिळणार आहेत. (Farmers will get agricultural implements on 90% subsidy)

हेही वाचा: सोयाबीनसह कपाशीचे बियाणे प्रयोगशाळेत फेल!


जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविते. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ताडपत्री पुरविण्याच्या योजनेसह ९० टक्के अनुदानावर लाभ देणाऱ्या इतर योजनांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने अंदाजपत्रकास मंजुरी दिली होती व सेस फंडातून निधीची मागणी केली होती. त्यानुसार या आर्थिक वर्षासाठी कृषी विभागाने योजना राबविण्यासाठी कंबर कसली असून शेतकऱ्यांकडून १४ जुलै पासून ३१ जुलैपर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा लागेल.

हेही वाचा: कपाशी घटली, सोयाबीन, तूर पिकांचा बोलबाला

या योजनांसाठी अर्ज मागविले
- सर्वसाधारण शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप पुरविणे.
- सर्वसाधारण शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोयाबीन स्वच्छ करण्यासाठी स्पायरल सेपरेटर, ग्रेडर पुरविणे.
- सर्वसाधारण शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्‍प्रेअर पुरविणे.
- सर्वसाधारण शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर प्लास्टीक ताडपत्री ४५० जीएसएम पुरविणे.

संपादन - विवेक मेतकर

Farmers will get agricultural implements on 90% subsidy

loading image