दुर्गा देवी विसर्जनादरम्यान पिता-पुत्र बुडाले; शोध व बचाव कार्य सुरू

अकोला तालुक्यामध्ये येत असलेल्या कुरणखेड येथील श्री चंडिका देवी मंदिरा जवळ मोठा तलाव आहे.
Sunil and Abhishek Waghadkar
Sunil and Abhishek WaghadkarSakal

अकोला - तालुक्यामध्ये येत असलेल्या कुरणखेड येथील श्री चंडिका देवी मंदिरा जवळ मोठा तलाव आहे. या तलावा मध्ये रविवारी 17 ऑक्टोबर रोजी अकोला येथील शिवसेना वसाहत रहिवासी वडील सुनील वाघडकर, वय 45 वर्ष व त्यांचा मुलगा अभिषेक वाघाडकर, वय 22 वर्ष हे दुर्गा देवी विसर्जनासाठी गेले. सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान दुर्गा देवीचे विसर्जन करत असताना तब्बल तीस ते पस्तीस फूट खोल तलावामध्ये दोन्ही पिता-पुत्र बुडाले.

Sunil and Abhishek Waghadkar
नादुरुस्त रस्त्यांच्या अडचणी तातडीने मार्गी लावा : बच्चू कडू

यासंबंधी उपस्थित इतर नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी आरडा-ओरडा सुरु केला. त्यानंतर याबाबतची माहिती बोरगाव मंजू पोलीस व चंडिका माता आपात्कालीन बचाव पथक आणि वंदे मातरम् आपात्कालीन बचाव पथक कुरणखेड यांना देण्यात आली. माहिती मिळताच चंडिका माता आपात्कालीन बचाव पथक आणि वंदेमातरम आपात्कालीन बचाव पथकाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत तलावामध्ये बुडालेल्या दोन्ही पिता-पुत्राचा शोध सुरू केला, परंतु रात्री 9 वाजेपर्यंत पिता आणि पुत्र दोघांपैकी एकाचाही पाण्यामध्ये थांगपत्ता लागू शकला नाही. दरम्यान यासंबंधीचे वृत्त लिहीपर्यंत घटनास्थळी पोलिसांसह दोन्ही आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य अंधारामध्ये बचावकार्य करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com