esakal | निर्माणाधीन रस्‍त्‍यावरील अपघातांचे भय संपेना
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

खामगाव : निर्माणाधीन रस्‍त्‍यावरील अपघातांचे भय संपेना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलडाणा) : गेल्या आठवडाभरात खामगाव-अकोला मार्गावर चार मोठे अपघात घडले आहेत. सुदैवाने या अपघातांमध्ये जीवीतहानी झाली नाही. मात्र, काहींना आजीवन अपंगत्व आले. त्यामुळे खामगाव-अकोला मार्गावरील अपघातांचे भय संपता संपत नसल्‍याचे दिसून येते. या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता कामाच्या संथ गतीमुळेच या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदाराला तातडीने रस्ता कामे पुर्ण करण्याबाबत निर्देश देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: मंत्री जितेंद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणात अटक: किरीट सोमय्या

खामगाव- अकोला मार्गावर गेल्या आठवड्यात खामगाव शहरातील बर्डे प्‍लॉट भागातील लग्न वऱ्हाड बाळापूरकडे जात असतांना त्यांच्या कारला वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ६ जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची शाई वाळत नाही तोच खामगावकडून प्रवासी घेऊन अकोला मार्गाने अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला समोरून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की त्यात बस आणि ट्रक दोन्ही वाहने जळून खाक झाली. तर बसमधील २० प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून बसमधील प्रवाशांचे जीव वाचले. तर ७ ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा याच मार्गावर खराब रस्त्यामुळे भरधाव लक्झरी बसचे टायर पुटल्याने लक्झरी बस डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या ट्रकवर जावून आदळली़. या अपघातातही १० प्रवाशी जखमी झाले.

राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून, यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यामधील खड्ड्यांना चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत़. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून संबंधित कंत्राटदाराला रस्ता निर्माण कार्य युध्द पातळीवर पुर्ण करण्याबाबत सुचना द्यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

सहा वर्षांपासून सुरू आहे रस्त्याचे काम

अकोला ते खामगाव या ७० किमी रस्त्याचे काम मागील सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू आहे. मात्र कंत्राटदारांनी अर्धवट कामे करून सोडून दिल्याने हा मार्ग प्रलंबित राहिला आहे. आता पुन्हा नव्याने कंत्राट देवून नव्या कंपनीला रस्ता निर्माण कार्य दिले आहे. मात्र, या कंपनीकडूनही या रस्त्याचे काम कासवगतीने केले जात आहे़

loading image
go to top