Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

अकोला जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.
Gas Cylinders Supply Closed

Gas Cylinders Supply Closed

ESakal

Updated on

अकोला - जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. एका बाजूला शहरातील हॉटेल, ढाबे आणि केटरिंग व्यवसाय सुरळीत सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला सामान्य कुटुंबांना बुकिंग करूनही आठ ते दहा दिवस सिलेंडर मिळत नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. “घरात गॅस नाही आणि बाजारात हॉटेलमध्ये जेवण मुबलक,” या विसंगतीमुळे प्रशासन आणि वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com