esakal | शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीचा मार्ग मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीचा मार्ग मोकळा

शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीचा मार्ग मोकळा

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

अकोला ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्ह्यात लॉकडाउन घोषित केले. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. तब्बल १५ दिवसानंतर सोमवारी (ता.२४) मात्र, बाजार समित्या सुरू करण्यात आल्या. पहिल्या दिवशी शेतमालाची आवक कमी झाली, मात्र लवकरच शेतकऱ्यांची लगबग वाढू शकते. (Fifteen days later the Agricultural Produce Market Committees begin)

खरीप तसेच रब्बीतील शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लगबग होती. शिवाय सोयाबीन, तूर, उडीद, मूग, हरभऱ्याला बाजार समितीमध्ये यंदा चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी अधिक कल होता. दरवर्षी शेतकरी योग्य भाव मिळेपर्यंत सोयाबीन, तूर व इतर शेतमालाची साठवणूक करून ठेवतात.

हेही वाचा: बार्शीटाकळीत गोळीबार; कापूस व्यवसायाच्या वादातून वाद; तिघे जखमी

यावर्षी मात्र, सोयाबीनला विक्रमी आठ हजार रुपयांपर्यंत बाजार समित्यांमध्ये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी याचवर्षी सोयाबीन विक्रीसाठी पसंती दर्शविली. हरभऱ्यालाही हमीभाव किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणला. मात्र, कोरोनाचे संकट गडद झाल्याने व प्रादुर्भाव वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाला लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा बंद करण्यात आल्या.

हेही वाचा: दवाखान्यातच सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण

त्यामुळे शेतकऱ्यांसाठी १५ दिवसांसाठी बाजार समित्यांचा दरवाजा बंद झाला आणि बाजार समितीमधील आवकही थांबली. आधिच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना लॉकडाउनमुळे शेतमाल विक्री न करता येऊ शकल्याने आर्थिक टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. सोमवारपासून (ता.२४) मात्र बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्ववत झाले असून, शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहिल्या दिवशी आवक कमी झाली असली तरी, यापुढे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळू शकते.

संपादन - विवेक मेतकर

Fifteen days later the Agricultural Produce Market Committees begin