अरे बापरे! धारदार शस्त्र, लोखंडी रॉडने दोन गटात झाली तुफान हाणामारी; मात्र याचा परिणाम झाला धक्कादायक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

गवळीपुरा येथील रहिवासी तसेच दूरचे नातेवाईक असलेल्या दोन गटात चार दिवसांपूर्वी तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत दोन्ही गटातील तब्बल वीस जणांनी एकमेकांवर धारदार शस्त्र, काठ्या, लोखंडी रॉड तसेच दगडफेक करून मारहाण केली.

अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीतील गंभीर जखमी असलेल्या जावेद बुदधू गौरवे यांचा शुक्रवारी दुपारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना मारहाण करणाऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत तब्बल १७ जण जखमी झाले असून, यामधील एकाचा मृत्यू झाला तर आणखी एक जन गंभीर जखमी आहे. या प्रकरणातील १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याना २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गवळीपुरा येथील रहिवासी तसेच दूरचे नातेवाईक असलेल्या दोन गटात चार दिवसांपूर्वी तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत दोन्ही गटातील तब्बल वीस जणांनी एकमेकांवर धारदार शस्त्र, काठ्या, लोखंडी रॉड तसेच दगडफेक करून मारहाण केली होती, त्यामुळे या हाणामारीत १७ जण जखमी झाले होते. त्यामधील दोन जण गंभीर जखमी झाले होते. तर यामधील एकाचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला असून, एक जण अद्यापही गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - अरे बापरे! एकाच दिवशी पाच कोरोना बळी; या जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 64 वर

या प्रकरणात शमीम मोहम्मद गौरवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी समीर यासीन चौधरी, साजिद इलियास चौधरी, फरदीन इलियास गौरवे, नाजिम कासम गौरवे,सोहेल यासीन चौधरी, साहिल यासीन चौधरी, फिरोज लल्लू गौरवे, आफताब इलियास गौरवे, इलियास लल्लू गौरवे, जहूर लल्लू गौरवे आणि शमीम बानो इलियास गौरवे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ५०४, ५०६, १४७, १४८ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र त्यानंतर जावेद बुद्धू गौरवे यांचा मृत्यू झाल्याने सदर आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसऱ्या गटातील शमीम बानो इलियास गौरवे यांच्या तक्रारीवरून सलीम बुद्धू गौरवे,मोहम्मद बुद्धू गौरवे,जावेद बुद्धू गौरवे, जब्बार बुद्धू गौरवे, बिलाल मोहम्मद गौरवे, आदिल मोहम्मद गौरवे, राजिक मोहम्मद नौरंगाबादी, रफीक मोहम्मद नौरंगाबादी, रफीक मोहम्मद नौरंगाबादी, मोहसिन आणि सोहेल यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 3३०७, ५०४, ५०६, १४७, १४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील राजिक मोहम्मद नौरंगाबादी, रफीक मोहम्मद नौरंगाबादी, शेख बाबर शेख भूरा गौरवे तसेच नाजिम कासम गौरवे, साजिद इलियास गौरवे, साहिल यासीन गौरवे, फरदीन इलियास गौरवे, समीर यासीन चौधरी, सोहेल यासीन चौधरी आणि शमीम इलियास गौरवे, सोहेल दर्गीवाले आणि मोहसिन नौरंगाबादी या १२ आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपींना २२ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight in two groups by The iron rod in akola district akola marathi news