अकोला : बावनबिर येथे ईदगाह परिसरात तुफान हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाणामारी

अकोला : बावनबिर येथे ईदगाह परिसरात तुफान हाणामारी

संग्रामपूर - बावनबिर येथे तुफान हाणामारीमध्ये २७ वर्षे युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ईद सणाच्या दिवशी घडली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे समजते. सोनाळा पोलीस स्टेशनकडून मुस्लिम बांधवांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर येथील टुनकी मेन रोड वरील आज 3 मे चे सकाळी ७:३० वाजता दरम्यान ईदगाव परिसर समोरील जुन्या वादातून एकमेंकांना जबर मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली. या मध्ये शेख रफिक शेख गणी नामक युवकाला जबर मारहाण झाली . जखमी अवस्थेत सोना ळा येथे नेले असता उपचारा दरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आज रमजान ईद निमित्त गावातील समस्त मुस्लिम बांधव नमाज पठण करण्याकरिता जात असताना अचानक एकाच समाजातील दोन्ही गटातील व्यक्तींनी एकामेकांना गंभीर स्वरूपाचे मारहाण करणे सुरू केले. या ठिकाणी उपस्थित पोलीस व ग्रामस्थ यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाच्या नागरिकांना शांततेचे आवाहन केले.आणि आज घडलेल्या गंभीर घटनेतील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले...!जुन्या वादातून एकमेकांची खुन्नस काढुन ईदगाव च्या समोरील मोठमोठ्याने शिवीगाळ करत तुफान हाणामारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणेदार श्रीधर गुट्टे हे घडलेल्या घटनास्थळी तात्काळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Web Title: Fighting In Eidgah Area At Bawanbir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top