तोतया डॉक्टरवर गुन्हा दाखल

लाखो रुपयांचा औषधी साठा रूग्नालयातच सील
fake doctors
fake doctorssakal

जउळका रेल्वे - मालेगाव तालुक्यातील किनीराजा येथे सहारा क्लिनिक थाटुन रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला रंगेहात पकडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वैद्यकीय पथकाने पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना १५ जूनला सायंकाळी घडली.

डॉ. संतोष प्रसादराम बोरसे अब ५० वर्ष व्यवसाय तालुका अधीकारी मालेगाव यांनी यासंबंधी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार तिथे गेले असता शाबुज संतोष विश्वास हे त्यांच्या क्लिनिकमध्ये आढळून आले. त्यांचेकडे वैद्यकीय व्यवसाय प्रमाणपत्राबाबत विचारणा केली असता त्यांचेकडे बीएएमएसचे प्रमाणपत्र आढळून आले . परंतु त्याचे नुतनीकरण केलेले नव्हते.

तसेच महाराष्ट्र राज्य वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतचा परवानाही नव्हता. ॲलोपॅथी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवानाही, स्थानिक प्रशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र, दवाखाना चालविण्याचे परवानाही आढळला नाही. त्यांच्याकडे वैद्यकीय कचरा विल्हेवाट व्यवस्थापन सोय नाही. दवाखान्यातील सर्व औषधी , टेबल खुर्ची व इतर वस्तु दवाखान्यात ठेवुन दवाखाना पंचांसमक्ष सील करण्यात आला.

जउळका पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गोरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com