पातुरात प्रथमच शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन

एजुविला पब्लिक स्कूल यांचा ऐतिहासिक शैक्षणिक उपक्रम
first time in Patura grand display of Shiva weapons akola
first time in Patura grand display of Shiva weapons akolasakal

पातूर : सक्षम प्रतिष्ठान शिरला एजुविला पब्लिक स्कूल पातुर यांनी ९ ते ११ एप्रिल या कालावधित सकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व एजुविला पब्लिक स्कूलच्या दशकपूर्ती निमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रे व दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन सकाळी आठ वाजतापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.पातुर येथील ऐजूव्हिला पब्लिक स्कूलच्या गाडगे लॉन येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या प्रेरणादायी शौर्याच्या इतिहासातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी याकरिता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून काढली व पहिली शिवजयंती साजरी करत क्रांतीची मशाल पेटवली अशाच क्रांतीच्या मशाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पेटवण्यासाठी ता. ९ ते ११ एप्रिल दरम्यान महात्मा फुले जयंतीपर्यंत पातूर येथे ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, तलवार, वाघनखे, दांडपट्टा ,कट्यार, भाला ,चिलखत ,जांबिया, बिछवा ,सुरई अशा विविध प्रकारचे शस्त्रास्त्र शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याची साक्ष देतील. त्यातून भारतवर्षाचे आधुनिक मावळे तयार होतील हा प्रदर्शन ठेवणे मागचा उद्देश असल्याचे सक्षम प्रतिष्ठानच्या विश्वस्त निर्मला गाडगे, विद्या नीलेश गाडगे, अक्षय राऊत, श्याम गाडगे यांनी सांगितले.

प्रदर्शनाच्या नियोजनासाठी प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची बैठक रविवारी पार पडली. तालुक्यातील सर्व शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा पिढी, इतिहास प्रेमी, इतिहासाचे अभ्यासक तथा सर्व नागरिकांना विविध शिवकालीन शस्त्रास्त्रे दुर्मिळ पुरातन वस्तू पाहण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांनी, विद्यार्थी, युवा पिढी, महिला व नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन ‘पातुर एक ऐतिहासिक शहर’चे अजिंक्य निमकंडे, निखिल इंगळे, पातुर तालुका विकास मंचचे शिवकुमार बायस, किरण कुमार निमकंडे, विलास हिरळकार, विजय राऊत, जय बजरंग फ्रेंड्स क्लबचे सनी शेलुडकर, गणेश निमकडे, पातुर तालुका इतिहास मंडळाचे प्राध्यापक समाधान सातारकर, तपे हनुमान व्यायाम शाळेचे राहुल भगत, फुलारी खडकेश्वर व्यायाम शाळेचे श्रीकृष्ण वस्ताद फुलारी, शरद नागे, भारत फुलारी, निखिल फुलारी, रेडिओ ऑरेंजचे आर्ची गौरव डोंगरे, सिदाजी व्यायाम शाळेचे मंगेश गाडगे, अक्षय राऊत, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळाचे प्राध्यापक विलास राऊत, डॉ. मदन नालिंदे भास्करराव कळाशीकर, साने गुरुजी सांस्कृतिक मंडळाचे विशाल राखोंडे, सागर राखोंडे, बाळू देवकर, जय भवानी व्यायाम शाळेचे संदीप तायडे, राहुल वाघ, हिंदू सेना व्यायाम शाळेचे संदीप गाडगे, नंदकिशोर पाटील, कुंदन घाडगे, प्रतीक हिरडकार, तोताराम उगले, हिंदुस्तानी फ्रेंड्स क्लबचे अमर वानखडे, पातुर तालुका क्रिकेट अकॅडमीचे पंकज पाटील आदींनी आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com