esakal | पहिलीच्या प्रवेशासाठी साडेपाच वर्षाची अट
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

पहिलीच्या प्रवेशासाठी साडेपाच वर्षाची अट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन ः शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट सहा ऐवजी साडेपाच वर्ष केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० सप्टेंबरला सहा वर्ष पूर्ण होणाऱ्या मुलांना पहिल्या वर्गात प्रवेश दिला जात होता. यंदापासून त्यात शिथिलता देत ३१ डिसेंबरची अट घालण्यात आली आहे. (Five and a half year condition for first admission)

हेही वाचा: अकोला जिल्ह्यातील १२.४५ लाख लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!

राज्य प्राथमिक शिक्षण विभागाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी साडेपाच वर्षे वयाची अट घातली. ती यापूर्वी याच विभागाने बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पहिलीमध्ये प्रवेश द्यावा या स्वतःच्याच पूर्व आदेशाला कोलदांडा दिला आहे. प्राथमिक शाळांनी या निकषांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता जानेवारीत जन्मणारे मूल पहिल्या वर्गात तर, डिसेंबर मध्ये जन्माला येणारे मूल दुसरीच्या वर्गात जाणार आहे. दुसरीकडे निकष प्रमाण मानून तीन महिने आधीच मुलांचा शैक्षणिक प्रवेश होत असल्याने सध्याच्या पटसंख्येत वाढ होत आहे. अशा वेळी गरजेनुसार अपेक्षित शिक्षक संख्या मात्र वाढणार नाही. याशिवाय पुढील वर्षी पटसंख्या घटल्यावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा: सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम


विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासावर होऊ शकतो परिणाम
कमी वयाच्या मुलांना पहिलीत प्रवेश दिल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. मुलांची शारीरिक क्षमता, आकलन क्षमता विकसित होणे, त्यानंतर अक्षर ओळख, संख्या ओळख होणे अपेक्षित असते. लहान वयातच शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या क्षमता विकास तसेच शैक्षणिक व भविष्यात अडथळे येऊ शकतात.

Five and a half year condition for first admission

loading image
go to top