esakal | मूर्तिजापूर पालिकेचे पाच कर्मचारी निलंबित, दोन शिक्षकांची वेतन कपात
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्तिजापूर पालिकेचे पाच कर्मचारी निलंबित, दोन शिक्षकांची वेतन कपात

मूर्तिजापूर पालिकेचे पाच कर्मचारी निलंबित, दोन शिक्षकांची वेतन कपात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : आपत्ती व्यवस्थापन काळात निष्काळजीपणा करणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या आदेशाची आवहेलना करणाऱ्या येथील नगर पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी मंगळवारी निलंबन केले. दोन शिक्षकांची एक दिवसाची वेतनात कपात केली. (Five Murtijapur Municipal Corporation employees suspended, two teachers' salaries cut)

शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन सर्व पालिका कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवेत वळती करण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा असतांना सुद्धा पूर्व परवानगी न घेता काही कर्मचारी आपल्या कामावर सतत गैरहजर राहातात. मुख्याधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अवहेलना करतात.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीचा मार्ग मोकळा

परस्पर सुटीचे अर्ज सादर करून कार्यालयातून निघून जातात. त्यामुळे कार्यालयीन कामातव सफाईच्या कामात खोळंबा निर्माण होत असल्यामुळे पाच सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. शिपाई प्रेमेंद्र चौधरी, सफाई कामगार शिवा बोयत, नारायण पिवाल, हरी दुधडे, सतिश खंडारे व माधव कावडे यांचा समावेश आहे.

शिवाय आपत्ती व्यवस्थापन काळात निष्काळजीपणा करणाऱ्या, वेळेवर न येणाऱ्या, परस्पर निघून जाणाऱ्या तसेच नेमुन दिलेले काम वेळेत न करणाऱ्या दोन शिक्षकांचे एक दिवसाची वेतन कपात करण्यात आली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद न.प. उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रेहानाबी आसलमखाँ व जेबीनप हिंदी विद्यालयातील सहाय्क शिक्षक प्रभाकर शिरसाट यांच्यावर एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: रक्ताच्या नात्यांनी नाकारले; दीपकने केला स्वीकार!

कामातील दिरंगाई व निष्काळजीपणा कदापी खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी काम जबाबदारीने व प्रामाणिकपणे पार पाडावे, अन्यथा अशा कठोर कारवाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.

-विजय लोहकरे. मुख्याधिकारी, न.प.मूर्तिजापूर.

संपादन - विवेक मेतकर

Five Murtijapur Municipal Corporation employees suspended, two teachers' salaries cut

हेही वाचा: रेड झोन; १ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य