अकोला : सलग दुसऱ्या दिवशी १९९ जणांचा वीज पुरवठा खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण आक्रमक

अकोला : सलग दुसऱ्या दिवशी १९९ जणांचा वीज पुरवठा खंडित

अकोला : वारंवार स्मरण करून देखील वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण(MSEDCl) नवीन वर्षात आक्रमक झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अकोला शहरात कारवाई करीत १९९ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित(eletricity cut) केला. या वीज ग्राहकांकडे १९ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी होती. मागील दोन दिवसात महावितरणकडून अकोला शहरातील(akola city) ४२२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. (for the second day 199 peoples cut the eletricity power by msedcl in akola)

हेही वाचा: निवडणुकीत उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या आघाड्या आमने-सामने भिडणार

सोमवार, ता. ३ जानेवारी रोजी महावितरणने वानखेडे नगर, लकडगंज, पिंजारी गल्ली, भीम नगर, नेहरू नगर, गजानन नगर, शिवसेना वसाहत, खिडकीपूर, हरिहर पेठ या परिसरातील २२३ थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाई केली होती. मंगळवारी देखील याच परिसरात कारवाई करण्यात आली. २८ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायम स्वरूपी खंडित करण्यात आला. या वीज ग्राहकांकडे पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी होती. महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करताच १०८ वीज ग्राहकांनी सहा लाख ४४ हजार रुपयांचा भरणा केला. महावितरणच्या आजच्या कारवाईमुळे परिसरातील अन्य १७८ थकबाकीदार वीज ग्राहकांनी आपल्या थकीत वीज देयकाची नऊ लाख २८ हजार रुपयांची रक्कम तत्काळ भरून कटू कारवाई टाळली.

अकोला मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता ज्ञानेश पानपाटील, व्यवस्थापक वित्त व लेखा धनराज शेंडे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रभाकर दहापुते, गणेश महाजन योगेश तायडे, सहायक अभियंता योगेश राठोड,आदित्य चिखले, राजाभाऊ चावरे, राजेश लोणकर, अनिल दाभाडे, विनायक शेळके, फयाजुद्दीन पटा, लेख विभागातील विकास गुल्हाने, अश्विन मेश्राम यांच्यासह जनमित्र आजच्या कारवाईत उपस्थित होते.

हेही वाचा: अकोला : शहरातील ५०० चौैरस फुटाच्या मालमत्तांचा कर माफ करा

संपूर्ण शहरात राबविणार मोहीम

अकोला शहरात ज्या भागात थकबाकीदार वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अश्या भागात महावितरणचे अभियंता आणि जनमित्र एकत्रीत कारवाई करीत आहेत. आगामी काळात शहरातील सर्व भागात ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolamahavitaranMSEDCL
loading image
go to top