Balapur News : बाळापूर शहरात धुमाकूळ घालणारे माकड जेरबंद

गत तीन दिवसांपासून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.
forest department action monkey jailed in Balapur city animal care
forest department action monkey jailed in Balapur city animal careSakal

बाळापूर : गत तीन दिवसांपासून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. या माकडाने शहरातील सहा जणांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करून ता. १ फेब्रुवारी रोजी माकड जेरबंद करण्यात करण्यात आले.

बाळापूर शहरातील गजबजलेल्या वस्तीत तीन दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला होता. या पिसाळलेल्या माकडाने तीन दिवसांमध्ये तब्बल सहा जणांना चावा घेतला. घरात घुसून जबर चावा घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळे दिवसा सुद्धा नागरिकांना घर बंद ठेवावे लागत होते. याची माहिती बाळापूर पोलिस स्टेशनचे रवींद्र राऊत, नागरिक गुलाब उमाळे, संजय उमाळे यांनी अकोला वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी विश्वास थोरात,

वनपाल गजानन इंगळे, रेस्क्यू टीमचे प्रमुख वनरक्षक संघपाल तायडे, मानद वन्यजीवरक्षक बाळ काळणे, यशपाल इंगोले, अक्षय पांढरे, सागर पल्हाडे यांनी बाळापूर गाठले. यावेळी घरांची रचना अडगळीची असल्याने माकडाला जेरबंद करणे जिकरीचे होते.

माकड शोधल्यानंतर त्याला पकडण्यासाठी या चमूने शर्थीचे प्रयत्न केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अचूक निशाणा साधत माकडाला जेरबंद करण्यात चमूला यश मिळाले. आता या माकडाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे.

नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

गत दोन ते तीन दिवसांपासून येथील शासकीय कार्यालये, पोलिस स्टेशन, बाजारपेठ व नागरिकांच्या वस्तीत धुमाकूळ घालून दहशत पसरविणाऱ्या माकाडाला गुरुवारी (ता.१) वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून जेरबंद केले.

परिसरात एका पिसाळलेल्या माकडाने नागरिकांना जेरीस आणले होते. या माकडाने आतापर्यंत सहा जणांना चावा घेतला. यामुळे तीघे जण गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाच्या चमूने माकडाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ट्रॅक्विलायझर गनद्वारे त्याल इंजेक्शन मारण्यात आले. इंजेक्शनच्या प्रभावामुळे सदर माकड बेशुद्ध झाले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com