esakal | "पीक विम्याच्या नावावर होणारी फसवणूक थांबवा"
sakal

बोलून बातमी शोधा

"पीक विम्याच्या नावावर होणारी फसवणूक थांबवा"

ग्रामस्तरीय पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी आग्रही मागणी विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लावून धरली आहे.

"पीक विम्याच्या नावावर होणारी फसवणूक थांबवा"

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

बुलडाणा : पीक विमा कंपन्या शेतकर्‍यांच्या जिवावर करोडो रुपयांची नफेखोरी करत असून शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काची भरपाई रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या अशा पीकविमा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे. (former MLA vijayraj shinde has demanded agriculture minister dada bhuse to stop fraud in the name of crop insurance)

हेही वाचा: कोरोना आटोक्यात येताच पाणीटंचाई; जिल्ह्यात ५३ विंधन विहीरींसह २३ कूपनलिका मंजूर

माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मागील महिन्यात बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार तर संपूर्ण राज्यातील १ कोटी १९ लाख शेतकर्‍यांच्या जिवावर प्रत्येक हंगामात जवळपास ५००० कोटी रुपयांची नफेखोरी करीत असल्याचा दावा केला होता. यावेळी ग्रामस्तरीय पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी आग्रही मागणी विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लावून धरली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने श्री. शिंदे यांनी श्री. भुसे यांची भेट घेऊन पीक विम्याबाबत चर्चा केली.

हेही वाचा:  खामगाव, बुलडाणा हॉटस्पॉट!,  427 पॉझिटिव्ह

पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या पीक कर्ज खात्यातून परस्पर काढून घेतली जाते. या रकमेवर शेतकरी व्याजसुद्धा भरतात. याच शेतकर्‍यांना नुकसानीनंतर विशिष्ट तासात नुकसान भरपाईचा दावा दाखल न केल्यास पीक विमा कंपन्या शेतकर्‍यांना नुकसान देण्यास नकार देत आहे अनेक तांत्रिक अडचणीमुळे नुकसान ग्रस्त शेतकरी विशिष्ट वेळात दावा दाखल करू शकत नाहीत. तरी अशा शेतकर्‍यांचे नुकसान भरपाईचे ग्रामस्तरीय पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई पीक विमा कंपन्यांनी द्यावी, याबाबत कृषी आयुक्त यांचे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा पीक विमा कंपन्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अशा प्रकारे फसवणूक करणार्‍या पीक विमा कंपन्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व ग्रामस्तरीय पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्याची आग्रही मागणी श्री. शिंदे यांनी केली. (former MLA vijayraj shinde has demanded agriculture minister dada bhuse to stop fraud in the name of crop insurance)