खामगाव, बुलडाणा हॉटस्पॉट!,  427 पॉझिटिव्ह

Akola corona News Khamgaon, Buldana Hotspot !
Akola corona News Khamgaon, Buldana Hotspot !

बुलडाणा  : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून, रुग्ण संख्या ही हळूहळू चिंता वाढवणारी ठरत आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये खामगाव व बुलडाणा शहरातील आकडेवारी ही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासन आता काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउननंतर कोरोना साखळी ब्रेक करण्यात काही प्रमाणात प्रशासनाला यश आले होते. त्यामुळे सोमवारी केवळ 118 रुग्ण बाधित आढळून आले. परंतु, प्रलंबित अहवालांची संख्या ही आकडेवारी आता 400 पार करत आज (ता.2) 427 व्यक्ती बाधित आल्याने चिंतेत भर पडली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3166 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2739 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 427 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 316 व रॅपिड टेस्टमधील 111 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1912 तर रॅपिड टेस्टमधील 827 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2739 अहवाल निगेटिव्ह आहेत.

आज (ता.2) 354 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात 2601 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 194 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह अहवाल
बुलडाणा शहरात 47, बुलडाणा तालुक्यात दुधा 3, सुंदरखेड 3, गिरडा 6, वरवंड 4, सागवन 3, चिखली तालुक्यात सावरगाव डुकरे 8, चिखली शहरात 34, सिंदखेड राजा शहरात 9, सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा 4, रताळी 3, मोताळा तालुक्यात बोराखेडी 5, खामगाव शहरात 55, खामगाव तालुक्यात आडगाव 4, घाटपुरी 4, गवंढळा 3, अंत्रज 9, देऊळगाव राजा शहरात 28, मेहकर शहरात 8, मलकापूर शहरात 24, नांदुरा शहरात 21, नांदुरा तालुक्यात वडनेर 3, जवळा बाजार 17, लोणार तालुक्यात खंडाळा 3,जळगाव जामोद तालुक्यात  मानेगाव 7, खांडवी 4, झाडेगांव 5, जळगाव जामोद शहरात 4, शेगाव शहरात 18, संग्रामपूर तालुक्यात सोनाळा 7

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com