देऊळगाव राजा : माजी आमदार डॉ. खेडेकर आणि शिवसैनिकांच्या भूमिकेत विसंगती

 मुख्यमंत्र्यांना दिलेल्या शुभेच्छा बॅनरवर भाजप नेत्यांना स्थान,पदाधिकारी अवाक
Former Shiv Sena MLA Dr Shashikant Khedekar wish cm Eknath Shinde remove banner of uddhav thackeray and put eknath shinde banner
Former Shiv Sena MLA Dr Shashikant Khedekar wish cm Eknath Shinde remove banner of uddhav thackeray and put eknath shinde banner sakal
Updated on

देऊळगाव राजा : शिवसेनेचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फेसबुक वॉल वर राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छांच्या बॅनर वरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटोला डच्चू तर चौकात लावलेल्या बॅनर वर भाजप नेत्यांना स्थान मिळाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर स्थानिक असंख्य शिवसैनिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून एकनाथ शिंदे गद्दार असल्याच्या घोषणा देत निषेध नोंदविला होता. दरम्यान माजी आमदार आणि मतदारसंघातील शिवसैनिकांच्या भूमिकेत विसंगती निर्माण झाली असून शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहे.

राज्यातील महाविकास आघाडीतील महत्वपूर्ण घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन बंडखोरी केली होती. या घटनेने राज्याच्या राजकारणात भूकंप घडला आणि अडीच वर्षे अत्यंत संयम आणि कुशलतेने सरकार चालविणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, राज्यभरात शिवसैनिकांमध्ये या राजकीय घडामोडीचा परिणाम पहावयास मिळत असून अनेक ठिकाणी शिवसैनिक संभ्रमावस्थेत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असताना सिंदखेडराजा मतदार संघाचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहे. राज्यात सत्तेचा उलटफेर नाट्य घडत असताना माजी आमदार डॉ खेडेकर आठवडाभर नोट रिचेबल होते, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ ''एकनाथ शिंदे गद्दार है" च्या घोषणा देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या असताना नेहमीच छोट्या छोट्या कार्यक्रमात उपस्थित राहत असलेले माजी आमदार शिवसैनिका सोबत नव्हते, त्यावेळी त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल होता. शिवसेनेतील बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर कुटुंबातील व्यक्तींच्या फेसबुक वर ज्या पोस्ट आणि शुभेच्छा बॅनर झडकले त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटोला डच्चू देण्यात आले, तर शहरातील बस स्थानक चौकात लावण्यात आलेल्या शुभेच्छा होर्डिंग वर भाजप नेत्यांच्या फोटो बरोबर ठाकरे यांचे फोटो पहायला मिळाले.

दरम्यान रविवारी डॉ.खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची भेट घेऊन शुभेच्छा दिल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरलझाले. परिणामी गत तीन दिवसापासून तालुक्यात शिवसेना पदाधिकारी,सामान्य शिवसैनिक आणि शिवसेना नेते तथा माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या भूमिकेत विसंगती दिसून येत आहे.येत्या काळात डॉ.खेडेकर राजकीय दृष्ट्या काय निर्णय घेतील याकडे मधु तीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

काही कार्यकर्त्यांनी बस स्थानक चौकात जो बॅनर लावला होता तो काढण्याचे आदेश मी स्वतः तालुकाप्रमुख या नात्याने संबंधितांना दिले.आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत ,वरिष्ठ नेत्यांचा काही निर्णय झाला तरीही आम्ही मूळ शिवसेने सोबत शिवसैनिकांसोबत यापुढेही राहू- दादाराव खार्डे तालुकाप्रमुख शिवसेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com