
साखरखेर्डा : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास पाणीपट्टी व घरपट्टी माफ करणार असल्याचे तालुक्यातील हिवरा गडलिंग या ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. हिवरागडलिंग ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचे ईतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करावे असे आवाहन नागरिकांनी केले आहे.