
अकोला ः गत काही दिवसांपासून पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल व डिझेलच्या दरात (Petrol and diesel rates) सतत वाढ करत आहेत. त्यामुळे अकोल्यात (Akola) स्पीड व पॉवरच्या पेट्रोलने मे महिन्याच्या सुरुवातीलाच शंभरी ओलांडली, तर आता साधारण पेट्रोलची सुद्धा ९९.३९ रुपये प्रतिलिटरने विक्री करण्यात येत असल्याने साधारण पेट्रोल सुद्धा लवकरच शंभरी गाठणार असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. (Fuel price hike; Hundreds to reach petrol soon!)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये या वर्षांच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर वाढ सुरू झाली होती. फेब्रुवारी अखेपर्यंत ही दरवाढ कायम राहिली. या कालावधीत अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर लिटरमागे शंभर रुपयांच्या आसपास पोहोचले. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरातही अभूतपूर्व वाढ झाली होती. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या वतीने पेट्रोल दरवाढी विरोधा आंदोलन सुद्धा करण्यात आले. त्यानंतर सुद्धा दरात कोणत्याच प्रकारचा बदल करण्यात आला नाही.
परंतु त्यानंतर मात्र पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले होते. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत होता. परंतु गत मे महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे अकोला महानगर पालिकाक्षेत्रातील पेट्रोल पंपांवर पॉवर व स्पीडच्या पेट्रोलने मे महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा शंभरी ओलांडली होती. त्यामुळे सध्या पॉवर किंवा स्पीड पेट्रोलची १०२.८३ रुपये
प्रतिलिटरने विक्री करण्यात येत आहे. दुसरीकडे साधारण पेट्रोल शंभरीपासून केवळ ६१ पैसेच दूर असल्याने लवकरच ते सुद्धा शंभरीवर पोहचणार असल्याचे दिसून येत आहे. डिझेलच्या दरात सुद्धा वाढ होत असल्याने प्रवासी व माल वाहतुकदारांना त्याचा फटका बसत आहे.
पॉवर पेट्रोल पोहचले १०२.८३ रुपयांवर
जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पॉवर किंवा स्पीडच्या पेट्रोलची विक्री १०२.८३ रुपये प्रतिलिटरने करण्यात येत आहे. ६ मे रोजी या पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. या दिवशी एक लिटर पेट्रोलसाठी वाहन धारकांना १०० रुपये १३ पैसे द्यावे लागले. त्यानंतर पॉवर किंवा स्पीडच्या पेट्रोलचे दर कमी झालेच नाही.
डिझेलनेही घेतली झेप
पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दरांमध्ये सुद्धा गत काही दिवसांपासून भडका पाहायला मिळत आहे. ३ मे रोजी डिझेलचे दर ८६.३८ रुपये प्रतिलीटर होते. त्यानंतर आता मात्र डिझेलची विक्री ८९.८४ रुपये प्रतिलिटरने करण्यात येत आहे. म्हणजेच २० दिवसांत डिझेलच्या दरात एक लिटरमागे ३.४६ रुपयांची वाढ झाली.
असे आहेत दर
प्रकार रुपये (प्रतिलिटर)
पावर/स्पीड १०२.८३
पेट्रोल ९९.३९
डिझेल ८९.८४
संपादन - विवेक मेतकर
Fuel price hike; Hundreds to reach petrol soon!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.