वऱ्हाडातील पाणीपुरवठा योजनांना ‘निधी’चा पुरवठा! | Watersupply scheme | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fund
वऱ्हाडातील पाणीपुरवठा योजनांना ‘निधी’चा पुरवठा!

वऱ्हाडातील पाणीपुरवठा योजनांना ‘निधी’चा पुरवठा!

अकोला : ग्रामीण भागात (Rural Area) पिण्याच्या पाण्याची (Drinking Water) गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत वऱ्हाडातील बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता (Administrative Permission) देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले.

राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओढाताण थांबावी यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (ता. मेहकर), चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (ता. खामगाव व शेगाव), पाडळी व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. जि. बुलडाणा), आणि घाटपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (ता. खामगाव) या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेलाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

हेही वाचा: अकोला : जिल्ह्यातून १०१ वी गुन्हेगारी टोळी हद्दपार

असा मंजूर केला निधी

जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत १० कोटी आहे. या योजनेअंतर्गत जानेफळ व कळंबेश्वर या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या १० कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जल जीवन मिशन अंतर्गत चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत ८८ कोटी ३५ लाख आहे. सदर योजनेअंतर्गत खामगाव व शेगाव तालुक्यातील ३१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पाडळी व पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत १६ कोटी नऊ लाख आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा तालुक्यातील सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत १८ कोटी ७८ लाख आहे. सदर योजनेअंतर्गत घाटपुरी या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

अकोला जिल्ह्याला दीडशे कोटी

तेल्हारा व ६९ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत १४८ कोटी ४३ लाख आहे. या योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील ७० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या १४८ कोटी ४३ लाख किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaFunding
loading image
go to top