GMC Acclaims Investigation After Ragging Complaint Found False
Sakal
अकोला
Akola News : 'जीएमसी' मध्ये रॅगिंगची ई-मेलद्वारे तक्रार; तपासात तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न; अधिकाऱ्यांनी केली चौकशी!
False Allegation : अकोल्यातील GMC मध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याची ई-मेल तक्रार; तपासात तक्रार खोटी ठरली, दोन्ही पक्षांनी आरोप नाकारले, प्रशासनाने चौकशी पूर्ण केली.
अकोला : अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थ्यांनी एका जूनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याची तक्रार महाविद्यालय प्रशासनाला ई-मेलद्वारे प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांनी तत्काळ बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. गायनॅकोलॉजी विभागासह इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दिवसभर चर्चा झाली.

