राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला जाण्यासाठी करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट

To go to Akola Marathi News Jijau Janmotsava, RTPCR test will have to be done
To go to Akola Marathi News Jijau Janmotsava, RTPCR test will have to be done

बुलडाणा : : कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर गर्दी  होणार्‍या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार जिल्ह्यात 12 जानेवारी 2021 रोजी साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व 14 जानेवारी रोजी असणारा संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याला साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये 20 लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

या सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रम स्थळी येणार्‍या व्यक्तींची 48 तासापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह अहवाल प्रमाणपत्र सोबत असावेत. उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू डाऊनलोड करावे. जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित व्यक्तींना आयोजन समितीकडून ओळखपत्र देण्यात यावे.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जन्मोत्सव दरम्यान होणार्‍या वेगवेगळ्या कार्यक्रमाच् प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र हे स्वतंत्र असावेत. ओळखपत्राशिवाय कोणत्याही कार्यक्रम स्थळी प्रवेश देऊ नये. जिजाऊ जन्मोत्सव दरम्यान सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. प्रतिकात्मक जिजाऊ जन्मोत्सवासाठी व्यक्ती, आयोजक, निमंत्रीत, सदस्य, सहाय्यक सेवेकरी, खाजगी सुरक्षा रक्षक व बंदोबस्तावरील लोक यांच्यासह कोणत्याही परिस्थितीत गर्दी, जमाव संख्या 50 पेक्षा जास्त होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

या उत्सवादरम्यान कोरोना या विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी गर्दी न करणे, सोशल डिसटसिंगचे पालन करणे, मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करणे याबाबतची कारवाई नगर पालिका व पोलीस विभाग करणार आहेत, असे जिल्हादंडाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी कळविले आहे.

कार्यक्रमस्थळी गर्दी करू नये
दरवर्षी 12 जानेवारीला ज्या पद्धतीने जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तो प्रत्येकाने आपण आहोत त्याच ठिकाणी साजरा करावा. कार्यक्रमस्थळी गर्दी करू नये. सिंदखेड राजा येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ मराठा सेवा संघाचे निवडक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मराठा विश्वभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

(संपादन -  विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com