बँकेला अंधारात ठेवून विकल्या शेळ्या, कर्ज घेतल्यानंतर १९ लाखांने फसवणूक

Goats sold in Akola Buldana News Bank in the dark, defrauded of Rs 19 lakh after taking loan
Goats sold in Akola Buldana News Bank in the dark, defrauded of Rs 19 lakh after taking loan
Updated on

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : बँकेकडून कर्ज स्वरूपात १९ लाख रुपये घेतले. त्यातून विकत घेतलेल्या शेळ्या बँकेला अंधारात ठेवून परस्पर विकून टाकल्या. बँकेची कर्जदाराने आर्थिक फसवूक केल्यामुळे कर्जदार व जमानतदार चौघांविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (ता.२७) रात्री गुन्हा नोंदविला. फसवणुकीच्या या प्रकरणातील आरोपींमध्ये तंटामुक्तीच्या माजी अध्यक्षांचा समावेश आहे.


याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या देऊळगाव राजा शाखे मार्फत ता. ४ सप्टेंबर २०१९ पूर्वी तालुक्यातील पांगरी माळी येथील विलास कोंडीबा वाघ व मथुराबाई शंकर वाघ यांनी बंदिस्त शेळीपालन करिता १८ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेमार्फत घेतलेल्या कर्जापायी हप्ते न भरता बँकेला अंधारात ठेवून कर्जदारांनी परस्पर शेळ्या विकून आर्थिक लाभ करून घेतला.

या प्रकरणात बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलीप छगन ठुमणे (वय ५९) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कर्जदार विलास कोंडीबा वाघ, मथुराबाई शंकर वाघ, जमानतदार शशिधर दगडू वाघ व बाजीराव बापूराव वाघ (रा.पांगरी माळी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बँकेचे हप्ते न भरता शेळ्या विकून विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण घुगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

बापरे! हवामान विभाग म्हणतो, आज मुसळधार पावसाची शक्यता 
 
आरोपींमध्ये तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष
बँकेमार्फत कर्ज घेताना दोन जमादारांची आवश्यकता असते. कर्जदाराने कर्जाचे हप्ते न भरल्यास कर्ज प्रक्रियेत बँकेच्या नियमानुसार जमानतदार यांनाही जबाबदार धरण्यात येते. बंदिस्त शेळी पालन व्यवसायाकरिता घेतलेल्या १८.७५ लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणात पांगरी येथील माजी सरपंचपती तथा तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष बाजीराव वाघ हे जमादार म्हणून होते. त्यामुळे बँकेच्या नियमानुसार त्यांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. कर्जदारासाठी त्यांच्यासह आणखी एकाला जमानत घेणे चांगलेच महागात पडले.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com