रेल्वेत नोकरीचं आमिष देऊन युवकाची 18 लाखांनी फसवणूक

railways
railways
Updated on: 

अकोला: नरसीपूर पंचगव्हाण, ता. तेल्हारा येथील खुशाल देवराव खरपकार (२६) यांच्या तक्रारीनुसार आरोपी माणिक चिंतामण गवारगुरू (रा. खकटा, ह.मु. तेल्हारा), नीलेश अरुण डोंगरे (रा. तेल्हारा) यासह इतर पाच अशा एकूण सात आरोपींनी संगनमत करून रेल्वेत नोकरी (Railway Job) लावण्याचे आमिष दाखवून तिकीट कलेक्टर पदाचे (post of ticket collector) खोटे नियुक्तीपत्र व प्रशिक्षण देऊन १८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी (tel hara police) २५ मे रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Government job of railway fraud in tel hara akola)

आरोपींपैकी पोलिसांनी माणिक चिंतामण गवारगुरू यास अटक करण्यात आली. २६ मे रोजी अटकेतील आरोपीस दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश तेल्हारा न्यायाधीशांनी दिले.

railways
कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार; डॉक्टरवर कारवाई, २५ लाखांचा औषधी साठा जप्त

या प्रकरणातील अन्य सहा आरोपींचा तेल्हारा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी बुलडाणा, नागपूर जिल्ह्यातही अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. तेल्हारा तालुक्यातही आणखी काही युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्यांनी तेल्हारा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे या प्रकरणी तपास करीत आहेत.

Government job of railway fraud in tel hara akola

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com