अरे वा! या जिल्ह्यात जीएमसीला मिळाले नवे 36 व्हेंटीलेटर; कोरोनाच्या काळात हा होणार फायदा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडे असलेल्या तुटपुंज्या व्हेंटीलेटरमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला होता. अशातच केंद्र सरकारकडून शनिवारी (ता.20) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला 36 व्हेंटीलेटर मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर पाठविले. त्यात अकोल्याचाही समावेश असून, शनिवारी सर्वोपचार रुग्णालयाला तब्बल 36 व्हेंटिलेटर प्राप्त झाले.

हेही वाचा - अरे वा! या जिल्ह्यात जीएमसीला मिळाले नवे 36 व्हेंटीलेटर; कोरोनाच्या काळात हा होणार फायदा

कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दररोज वाढत असताना सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटीलेटरसाठी वेटींगवर राहण्याची वेळ आली होती. परंतु, आता व्हेंटीलेटर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम झाली असून, रुग्णांना व्हेंटीलेटसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. पर्यायाने अनेकांचा जीव वाचण्याची शक्यता वाढली असून, डॉक्टरांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

आता मनुष्यबळही मिळणार
कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे कंत्राटी तत्वावर परिचारीसांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदभरती राबविली होती. त्या अंतर्गत दररोज दहा ते वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात येत आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांना व्हेंटीलेटर
केंद्र सरकारकडून राज्यातील विविध जिल्ह्यांना व्हेंटीलेटर मिळाले असून, त्यात अकोल्याचाही समावेश आहे. अकोला जीएमसीला 36 व्हेंटीलेटर मिळाल्याने कोरोना विरुद्धचा लढा आणखी सक्षमपणे लढता येईल.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्र.अधिष्ठाता, जीएमसी, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government medical college got 36 new ventilators in akola district