ग्रामसेवकांना प.सं.मध्ये बसवणे भोवले; बीडीओंची होणार चौकशी, पंचायत समितीमध्ये घडला होता प्रकार

प्रा.अविनाश बेलाडकर 
Wednesday, 29 July 2020

ग्रामसेवकांची नियुक्ती गावांमध्ये न करता त्यांना केवळ पंचायत समितीमध्ये बसवून ठेवल्यात आल्याचा प्रकार मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये घडला होता. सदर प्रकरणी मूर्तिजापूरच्या तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. हा प्रकार काही महिन्यांपूर्वी तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांच्या पाहणीतून समोर आला होता.
 

अकोला   ः ग्रामसेवकांची नियुक्ती गावांमध्ये न करता त्यांना केवळ पंचायत समितीमध्ये बसवून ठेवल्यात आल्याचा प्रकार मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये घडला होता. सदर प्रकरणी मूर्तिजापूरच्या तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. हा प्रकार काही महिन्यांपूर्वी तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांच्या पाहणीतून समोर आला होता.

जिल्हा परिषदेत कार्यरत एका ग्रामविकास अधिकाऱ्याला पदोन्नती मिळाल्यानंतर सुद्धा नवीन ठिकाणी नियुक्ती होत नव्हती. त्यामुळे त्याने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे धाव घेतली होती. या प्रकारावरुन सीईओंनी मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये धाव घेतली होती. यावेळी पंचायत समितीत ग्रामसेवकांना बसवून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. सदर प्रकरणी संबिंधत अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी तसे न केल्याने सदर प्रकाराची आता चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
 
चौकशीची जबाबदारी यांच्यावर
मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांना बसवून ठेवल्याच्या प्रकरणाची चौकशीसाठी जिल्हा परिषदेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात सामान्य प्रशासन विभाग, पंचायत, लेखा विभागातील अधिकाऱ्यांना समावेश आहे. ही समिती सविस्तर चौकशी करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर कार्यवाहीची दिशा निश्‍चित होणार असल्याची माहिती आहे.
(संपादन-विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gramsevaks were persuaded to settle in P.S. BDO will be interrogated, Akola Murtijapur Panchayat Samiti