पालकमंत्री बच्चू कडू म्हणतात तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा!

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 2 July 2020

कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत नाही असे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत काही जणांच्या चुकीच्या भूमिकेमुळे संपूर्ण शहराला धोक्याच्या छायेत ठेवणे योग्य होणार नाही. तेव्हा, तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

अकोला   ः कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत नाही असे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत काही जणांच्या चुकीच्या भूमिकेमुळे संपूर्ण शहराला धोक्याच्या छायेत ठेवणे योग्य होणार नाही. तेव्हा, तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी (ता. 1) कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार येत्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या रॅपिड टेस्ट किटच्या सहाय्याने करावयाच्या चाचण्यांचे नियोजन करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.

प्रतिबंधित क्षेत्रात बंदोबस्त कडक ठेवा
प्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त अधिक कडक असला पाहिजे. या क्षेत्राच्या बाहेरुन आत व आतून बाहेर ये-जा करता कामा नये. जोखमीचे व अन्य व्याधींनीग्रस्त लोकांच्या चाचण्या पूर्ण करा. सर्वेक्षणाअंती ज्या ज्या लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे असे वाटते त्यांच्या चाचण्या करा. तपासणीसाठी सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश कडू यांनी यावेळी दिले.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Bachchu Kadu says take action against those who do not cooperate with the investigation!