गुटखाबंदीला मिळेना मुहूर्त! पालकमंत्र्यांच्या आदेशाची दिरंगाई | Gutkha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gutkha

गुटखाबंदीला मिळेना मुहूर्त! पालकमंत्र्यांच्या आदेशाची दिरंगाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा - जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्रीपद असून, तिथेच मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गुटखा विक्री व तस्करी होत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे सातत्याने गुटखा विक्री व तस्करीवर निर्बंध आणत कारवाईचे आदेश देत आहे. त्यांचे गुटखामुक्त बुलडाणा करण्याचा उद्देश मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून दिरंगाईच्या कचाट्यात असून, पोलिसांचेजी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. २४ तासापेक्षाही अधिक कालावधी लोटला तरी, जिल्ह्यात ठोस अशी गुटखा विक्रीवर कारवाईच झाली नसल्याने आदेशाच्या अंमलबजावणीला मुहूर्त मिळेल का असा सवाल उपस्थित होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात काही महिन्यांअगोदर प्रभावी अंमलबजावणी करत गुटखा विक्री आणि तस्करीवर पोलिस विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच बुलडाणा जिल्हा राज्यात गुटखामुक्त जिल्हा होणार अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु, कालांतराने याकडे दुर्लक्ष होऊन अन्न व औषध प्रशासनानेही दिरंगाई केल्यामुळे गुटखा विक्री आणि तस्करांची चांगलीच फावली. जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणल्या जाऊन तो जिल्ह्यातील विविध भागात विक्री केल्याचे लहान- मोठ्या कारवाईवरुन समोर आले आहे.

हेही वाचा: Akola : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटले

यासंदर्भात नुकतीच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पोलिस विभागाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेत गुटखा विक्री व तस्करीवर निर्बंध घालत कारवाई करण्याचे आदेश दिले. गोपनीय माहिती देणार्‍याला बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्याचेही निर्देश दिलेले असतानाही, अद्यापही एकही ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील गल्ली पासून अगदी जिल्हा मुख्यालयातील पानटपर्‍या, किराणा दुकान आणि हातगाड्यांवर सर्रास गुटखा विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही विभागाचा समन्वय आणि त्यानंतर कारवाई याला कधी मुहूर्त मिळणार याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ग्रामीण भागात काणाडोळा

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि इतर बाबी नसल्यामुळे त्यांना जिल्ह्यात कारवाई करण्यासाठी पोलिस विभागावर अवलंबून राहावे लागते. परंतु, पोलिस विभागाकडूनच दुर्लक्ष होत असले तर गुटखा बंदी होणार कशी हा मोठा प्रश्‍न आहे. अनेक ठिकाणी गुटखा विक्रीवर कारवाईची माहिती काही व्यक्तींकडून लीक होऊन तस्करांपर्यंत पोचते. त्यामुळे ते सावध होत हाती काहीच लागत नाही. यात प्रामुख्याने ग्रामीण भागाचा समावेश आहे.

loading image
go to top