उष्णतेची लाट, लावेल कुक्कुटपालनाची वाट!

कोंबड्यांना उष्माघाताचा धोका; उपाययोजना गरजेची
Heat wave wait for Lavel Poultry Hens at risk heatstroke
Heat wave wait for Lavel Poultry Hens at risk heatstrokesakal media

अकोला : जिल्ह्यात सध्या पारा ४३ अंशापार गेला आहे. कोंबड्यांचे शारीरिक तापमान इतर पक्षी, प्राण्यांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघाताने कुक्कुटपालन धोक्यात येऊ शकते व ते टाळण्यासाठी योग्य संरक्षित उपाययोजन करण्याचा पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला गेला आहे.

काय आहे उष्माघात?

पक्ष्यांच्या शरीरातील उष्म्याचे असंतुलन होऊन उष्मा प्रमाणाबाहेर वाढतो, त्यावेळी पक्षी उष्माघातास बळी पडतात. जेव्हा अधिक काळापर्यंत पक्ष्यांच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा शरीरातील खर्च होणाऱ्या उर्जेपेक्षा जास्त असते, तेव्हा त्या स्थितीस क्रोनिक हीट स्ट्रेस असे म्हणतात तसेच जेव्हा ही ऊर्जा कमी काळासाठी परंतु, अतिप्रमाणात तयार होते तेव्हा त्यास अक्यूट हीट स्ट्रेस म्हणतात. या दोन्ही प्रकारात पक्ष्यांमध्ये मरतूक होऊ शकते.

उष्माघाताची कारणे

शरीराची सामान्य देखभाल, वाढ व प्रजनन ही शरीरातील उष्णता वाढण्याची मुख्य कारणे आहेत. याबरोबरच पक्ष्याचे वजन, जात, वयोगट, खाद्याचे प्रमाण, खाद्याची गुणवत्ता, शरीरिक हालचाल हे घटकही ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याशिवाय शेडमधील वायुवीजन, वातावरणातील आद्रता, तापमान इत्यादी घटकसुद्धा पक्ष्यांच्या शरीरातील उष्णतेवर परिणाम करतात. याचप्रमाणे शरीरावरील दाट पिसांची रचना व स्वेद ग्रंथी नसल्यामुळे पक्षी इतर प्राण्यांच्या तुलनेत उष्माघातास सहज बळी पडतात.

पक्ष्यांचा उष्णतेस प्रतिसाद

साधारणतः पक्ष्यांचे शारीरिक तापमान १०४ ते १०६ अंश फेरनाईट इतके असते. थंड वातावरणात ते ७३ अंश फेरनाईटपर्यंत तग धरतात. प्रमाणापेक्षा वाढलेले शारीरिक तापमान कमी करण्यासाठी पक्षी श्वसनाचा वापर करतात. मात्र, शारीरिक तापमानापेक्षा सभोवतालचे तापमान अधिक असल्यास त्यांना शारीरिक तापमान नियंत्रित करणे अवघड होते व ते उष्माघातस बळी पडतात.

''मुळात कोंबड्यांचे शारीरिक तापमान १०४ ते १०६ अंश फेरनाईट इतके असते आणि वातावरणातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास कोंबड्यांचा डीहायड्रेशन होऊन उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. सध्या तापमानाचा जोर वाढत असून, कुक्कुटपालकांनी कोंबड्यांचे संरक्षित व्यवस्थापन करावे. पाण्याची टाकी शेडमध्ये असावी. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यांने अँटीस्ट्रेस, बी-कॉम्प्लेक्स औषधी सुद्धा पक्ष्यांना द्यावीत.''

- डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, अकोला

उष्माघाताची लक्षणे

  • पक्षी सुस्तावणे, पंख विस्फारून बसणे, धाप टाकणे.

  • चक्कर येणे, खूप तहान लागणे, भूक मंदावणे व स्वजाती भक्षण.

  • मोकळा द्रव उदर पोकळीत साचणे (असायटीस)

  • रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे.

  • अंड्याचे कवच पातळ होणे.

  • प्रजनन क्षमता कमी होणे, वाढीचा दर खुंटणे.

  • मूत्रविसर्जन वाढल्यामुळे इलेक्ट्रालाईटसची कमतरता भासणे.

उपाययोजना

  • पक्ष्यांसाठी थंड पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता करणे.

  • शेडमध्ये पंखे, कुलर व फॉगर इत्यादी साधने वापरून वायुवीजन वाढविणे.

  • शेडवरील पत्र्यावर गवताच्या पेंढ्याचे अच्छादन करणे.

  • शेडमधील पक्ष्यांची गर्दी कमी करणे व प्रतिपक्षी लागणारी जागा वाढविणे.

  • छपराव स्प्रिंकलर्स लावून शेडचे तापमान नियंत्रित करणे.

  • शेडमधील तूर ओली होऊ न देणे.

  • आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्व ई व क चा पुरवठा करणे.

  • पाण्यातून इलेक्ट्रोलाईटसचा पुरवठा करणे, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • खाद्यातून आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या अर्काच्या मिक्षणाचा पुरवठा करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com