esakal | वऱ्हाडात पावसाचा जोर; नदी नाल्यांना पूर, अकोला-अकोट मार्ग बंद
sakal

बोलून बातमी शोधा

वऱ्हाडात पावसाचा जोर; नदी नाल्यांना पूर, अकोला-अकोट मार्ग बंद

वऱ्हाडात पावसाचा जोर; नदी नाल्यांना पूर, अकोला-अकोट मार्ग बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : वऱ्हाडातील तिन्ही जिल्हे अकोला, बुलडाणा व वाशीमध्ये २४ तासांत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जल प्रकल्पातील पाणीसाठा वाढला असून, नदी पात्रात पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आला आहे. गांधीग्राम येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने अकोला-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वऱ्हाडातील काटेपूर्णा, खडकपूर्णा या प्रकल्पांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा, धनज बुद्रूक, हिवरा लाहे या तीन मंडळांमध्ये तर विक्रमी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारपासून या भागांत पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर पाऊस झाला. मंगळवारी (ता. सात) सकाळीसुद्धा जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अधून-मधून पावसाच्या सरी हजेरी देत होत्या. या पावसाचा प्रकल्पांना मोठा फायदा होत आहे. पश्‍चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये सरासरी ८० टक्क्यांपर्यंत जलसाठा पोपोचला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी काटेपूर्णाचे दोन तर खडकपूर्णाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याची आवक लक्षात घेत पाण्याच्या विसर्गाबाबत प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा: पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

वऱ्हाडातील प्रमुख पूर्णा नदीलाही पूर आला होता. या पावसामुळे प्रामुख्याने काढणी सुरू असलेल्या मूग, उडीद तसेच काही दिवसांत सुरू होत असलेल्या सोयाबीन काढणीलाही फटका बसू शकतो. लवकर येणारे सोयाबीनचे वाण परिपक्व झाले आहेत. शेतकऱ्यांची काढणीची लगबग सुरू झाली असतानाच पावसाने ठाण मांडले आहे. आणखी तीन दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वऱ्हाडात झालेला पाऊस

  • अकोला जिल्हा

अकोट ४४.३, मुंडगाव ५९.३, पणज ४३.८, चोहोट्टा ४०, बाळापूर ७१.३, पारस ५९.३, व्याळा ७६, वाडेगाव ४३.३, उरळ ५०, निंबा ५२.५, हातरुण ४२.८, पातूर ४८.८, बाभूळगाव ४१.८, आलेगाव ४२.५, सस्ती ४०, अकोला ५६.३, घुसर ५६.३, दहिहांडा ५२, कापशी ५२.५, उगवा ५३.५, आगर ५२.८, बोरगाव मंजू ४३.८, शिवणी ४९.५, पळसो ४६.५, सांगळूद ४८.८, कुरणखेड ४५.३, कौलखेड ४७.५, बार्शीटाकळी ५४.८, महान ५९, राजंदा ८०.५, धाबा ६१, पिंजर ४६, खेरडा ६४, मूर्तिजापूर ५५, हादगाव ४५.८, निंभा ७५.८, माना ९०, शेलू बाजार १२०, लाखपूरी ७६.८, कुरुम ९८.३, जामठी ९२ मिलिमीटर ः अकोला जिल्हा सरासरी ५०.८ मिमी.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

  • बुलडाणा जिल्हा

अमडापूर ५३.५, उंद्री ५०.८,हातणी ४०, जानेफळ ६०.५, हिवरा आश्रम ४७.८, देऊळगाव माळी ४५.५, वरवंड ८२.५, लोणी ६५.५, खामगाव ९५, पिंपळगावराजा ७०, हिवरखेड ८६.८, काळेगाव ८८.३, आवार ५९.३, अटाळी ४५.५, पळशी बुद्रूक ५२.८, जलंब ४२.८, जवळाबुद्रक ६७, ः बुलडाणा जिल्हा सरासरी २९.३, मिमी.

  • वाशीम जिल्हा

वाशीम ४८, पार्डी टकमोर ७०, राजगाव ४८.८, वारला ४४.८, पार्डी आसारे ५३.३, मालेगाव ४५, किन्हीराजा ५०, जऊळका ४२.३, मंगरुळपीर ५१.३, शेलू खुर्द ८६.५, आसेगाव ३९.८, पोटी ७९.५, धानोरा खुर्द ४०.३, पार्डी तड ५०.८, मानोरा ४९, कुपटा ५३.३, गिरोली ४०.३, उमरी बुद्रूक ४२, कारंजा १३८, धनज बुद्रू १०६, हिवरा लाहे १२३, उंबरडा बाजार ४७.८, कामरगाव ७३.५, खेर्डा बुद्रूक ४०, पोहा ६५.८ ः वाशीम जिल्हा सरासरी ४७.६ मिमी.

loading image
go to top