अरे हे काय?  वंचित बहुजन आघाडीच्या नावाने चक्क सोशल मीडियावर बनविले फेक अकाऊंट

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 19 June 2020

वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या नावाने सोशल मीडियावर पक्षाच्या अधिकृत पेजेस व्यतिरिक्त अनेक ग्रुप, पेजेस आणि प्रोफाईल्स कार्यरत आहेत. यातील काही अकाऊंट पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बनवलेले आहेत, तर काही अकाऊंट पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी बनवलेले असल्याचे लक्षात आले आहे.

अकोला  ः वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या नावाने सोशल मीडियावर पक्षाच्या अधिकृत पेजेस व्यतिरिक्त अनेक ग्रुप, पेजेस आणि प्रोफाईल्स कार्यरत आहेत. यातील काही अकाऊंट पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बनवलेले आहेत, तर काही अकाऊंट पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी बनवलेले असल्याचे लक्षात आले आहे.

फेक अकाउंटच्या माध्यमातून चुकीच्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट पसरवून वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा मलिन करण्याचे हे षड्यंत्र आहे. त्यामुळे पक्षाने अशा फेक आयडीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका ही बाळासाहेब आंबेडकर यांचे व्हेरिफाईड फेसबुक पेज (ब्लू टिक असलेले) आणि व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट तसेच वंचित बहुजन आघाडीचे व्हेरिफाईड फेसबुक पेज (ब्लू टिक असलेले) आणि व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट आणि प्रबुद्ध भारतचे व्हेरिफाईड फेसबुक पेज आणि ट्विटर अकाउंट याद्वारे प्रसारित केली जाते. त्यामुळे सर्वांनी हे अधिकृत अकाऊंट फॉलो करावे आणि यावर प्रसारित झालेली भूमिकाच पक्षाची अधिकृत भूमिका समजण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hey whats up Fake account created on social media in the name of deprived Bahujan Aghadi akola marathi news