या वयोगटाला कोरोनाची भीती अधिक, कारण बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण आहे सर्वाधिक, पहा कोणता वयोगट आहे ते...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

कोविड बाधितांचे जिल्ह्यात जे मृत्यू झालेत त्यात विशिष्ट वयोगटातील बाधितांची मृत्यू संख्या अधिक आहे. या सोबतच मृत्यू झालेल्यांमध्ये ज्या रुग्णांना पूर्वीचे आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब वा श्वसनाचे अन्य आजार आहेत अशांचे प्रमाण अधिक आहे, अशीमाहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

अकोला : कोविड बाधितांचे जिल्ह्यात जे मृत्यू झालेत त्यात विशिष्ट वयोगटातील बाधितांची मृत्यू संख्या अधिक आहे. या सोबतच मृत्यू झालेल्यांमध्ये ज्या रुग्णांना पूर्वीचे आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब वा श्वसनाचे अन्य आजार आहेत अशांचे प्रमाण अधिक आहे, अशीमाहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे काल (दि.२७) पर्यंत ५०८ रुग्णांचे कोवीड १९ या विषाणुजन्य आजाराचे पॉझीटीव्ह अहवाल प्राप्त आहे, त्यापैकी ३१२ रुग्ण रोगमुक्त (६२ टक्के बरे होण्याचे प्रमाण) होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे व मृत्यु झालेल्या रुग्णांच्या निरिक्षणामध्ये काही बाबी आढळलेल्या आहे.

जिल्ह्यात २७ मेपर्यंत २७ मृत्यू (५५ टक्के डेथ रेड) झाले व एक आत्महत्या आहे. मयत झालेल्या पैकी सर्वाधिक १६ रुग्ण हे ५० ते ७० या वयोगटातील आहे. तसेच ७ रुग्ण हे ३० ते ५० वर्ष वयोगट व ४ रुग्ण हे ७ ० वर्षापेक्षा जास्त वयोमानाचे होते. २७ पैकी १३ रुग्ण हया स्त्रिया व १४ रुग्ण पुरुष आहेत. हे सर्व २१ रुग्ण हे कंटेन्टमेंट झोन मधुन आले होते. मयत रुग्णापैकी ३ रुग्ण हे मयत झाल्यानंतर(ब्रॉट डेड) रुग्णालयात आणले गेले. एकुण ७ रुग्णांचा मृत्यु रुग्णालयात आणल्या नंतर २४ तासाच्या आत उपचारा दरम्यान झाला. नऊ रुग्णांचा मृत्यू २४ ते ७२ तासांच्या उपचार दरम्यान आणि आठ रुग्णांचा मृत्यु ७२ तासानंतर उपचारा दरम्यान झाला. २४ रुग्णामध्ये सोबत गंभीर आजार (मधूमेह, उच्च रक्तदाब,श्वसनाचे आजार इ. ) असल्याचे आढळून आले.

ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी
जे रुग्ण ५० ते ७० वयोगटातील आहे व ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब श्वसनाचे आजार आहे, असे व्यक्ती हे कोविड १९ या विषाणूजन्य आजाराच्या विळख्यात येऊन मयत झाले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अशा नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या या आजाराची नियमीत तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावा व दमा ,ताप, खोकला ,स्नायुदुखी, डोके दुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे कोविड १९ या आजाराच्या तपासणीकरीता व समुपदेशनकरिता संपर्क साधावा.

बालकं, गर्भवती महिलीही प्रभावित
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लहान बालके, गर्भवती महिला व तरुण यामध्येही आढळून येत असल्याचे निरीक्षण अहवालाने स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासन भारत सरकार महाराष्ट्र राज्य सरकार यांनी लॉकडाउन संबधित आखुन दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest mortality rate among corona sufferers in this age group, see which age group is ...