esakal | महामार्गावरील अतिक्रमण; पोलिसांना शिविगाळ, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरील अतिक्रमण; पोलिसांना शिविगाळ, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

महामार्गावरील अतिक्रमण; पोलिसांना शिविगाळ, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे बांधकाम सुरू आहे. या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण बुधवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे काहीकाळ तणावाची स्थिती होती. पोलिसांना महिलांनी शिविगाळ केली तर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली. अखेर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. (Highway encroachment; Insulting the police, pushing the staff)

हेही वाचा: दोन गटातील एकूण सहा गंभीर जखमी, दोन ट्रॅक्टर नदीत फेकले


अमरावती ते चिखली (जळगाव) पर्यंतच्या २४३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले अनेक वर्षांपासून रखडले होते. नवीन कंत्राटदार नियुक्त करून हे काम पूर्ण केले जात आहे. महामार्गाच्या अकोला शहरातून जाणाऱ्या भागावरील सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. या मार्गावरील शिवणी परिसरातील ३० ते ४० घरांचे अतिक्रमण होते. थेट रस्त्यापर्यंत पक्के व कच्चे बांधकाम करून घरे बांधण्यात आली होती. रस्ता कामात अडथळा येत असल्याने हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दोन महिन्यांपूर्वी रितसर नोटसही बजावण्यात आली होती. त्यानंतरही नागरिकांकडून कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने व मार्गाच्या कामात विलंब होत होता.

हेही वाचा: खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

अखेर पोलिस बंदोबस्तात बुधवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई जेसीबीद्वारे सुरू करण्यात आली. पक्की, कच्ची घरे पाडण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांचा ताफा वाढविण्यात आला. पोलिसांनी कारवाईत अडथळा आणणाऱ्या नागरिकांना बळाचा वापर करून बाजूला केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांनाच शिविगाळ करण्यास सुरू केली. अखेर मार्ग कामातील अडथळा निर्माण होणारे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढून मार्ग मोकळा करण्यात आला. या कारवाईत अनेकांच्या पक्क्या घरांची पडझड झाल्याने नागरिक संतापले होते.

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी

कायदेशिर कार्यवाही करूनच हटविले अतिक्रमण
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरलेले अतिक्रमण कायदेशिर कार्यवाही करूनच हटविण्यात आले आहे. त्यासाठी दोन-तीन महिने आधीपासूनच नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. जेणेकरून नागरिकांचे होणारे नुकसान टाळता यावे. मात्र, नागरिकांना नोटीसकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज अतिक्रमण काढण्यात आल्याचे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखडे यांनी नागरिकांना समाजून सांगितले.

हेही वाचा: पोटनिवडणूक; आठ उमेदवारांचे अर्ज बाद


शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर होणार कारवाई
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न काही नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ठाणेदार किशोर वानखडे यांना सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

Highway encroachment; Insulting the police, pushing the staff

loading image