Heavy police deployment in Akola after protests over an atrocity against a woman turned tense.
Sakal
अकोला
Akola Atrocity Case: आकाेल्यातील महिलेवरील अत्याचाराविरोधात हिंदू संघटना एकवटल्या; पाच दुकाने जमीनदोस्त, तणावाचे वातावरण!
Police Action After Agitation in Akola: अकोल्यात हिंदू संघटनांचा आक्रमक पवित्रा; अत्याचाराविरोधात पाच दुकाने हटवली
अकोला: शहरातील गजबजलेल्या गांधी रोडवर उघडकीस आलेल्या एका गंभीर आणि संतापजनक अत्याचार प्रकरणानंतर बुधवारी (ता.४) विविध हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आरोपीकडून महिलेवर फसवणूक, अत्याचार तसेच धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद उमटले. दरम्यान, संबंधित घटनास्थळ असलेले ‘परी बिंदी घर’ आणि आजूबाजूची अवैध अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी दुपारीच घटनास्थळासह चार दुकाने हटवली. या कारवाईदरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत मनपाने ही कारवाई पार पाडली.

