मतिमंद व दिव्यांग मुलीवर होमगार्डने केला पाशवी अत्याचार

धीरज बजाज
Tuesday, 1 September 2020

जनतेच्या रक्षणासाठी पोलीस रात्रंदिवस झटत असतात त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सण-उत्सव आणि अनेक वेळा बंदोबस्ताची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी गृहरक्षक दलाच्या जवानांवर असते तेही अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात म्हणून समाजात गृहरक्षक दलाच्या जवानांना सन्मानाच्या नजरेने पाहिल्या जाते. परंतु याला अपवाद म्हणून हिवरखेड येथील गृहरक्षक दलाचा जवान संतोष सिताराम इंगळे ह्याने एका मतिमंद व दिव्यांग मुलीवर पाशवी अत्याचार करून बलात्कार केल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना हिवरखेड येथे घडली आहे.

हिवरखेड (जि.अकोला)  : जनतेच्या रक्षणासाठी पोलीस रात्रंदिवस झटत असतात त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सण-उत्सव आणि अनेक वेळा बंदोबस्ताची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी गृहरक्षक दलाच्या जवानांवर असते तेही अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात म्हणून समाजात गृहरक्षक दलाच्या जवानांना सन्मानाच्या नजरेने पाहिल्या जाते. परंतु याला अपवाद म्हणून हिवरखेड येथील गृहरक्षक दलाचा जवान संतोष सिताराम इंगळे ह्याने एका मतिमंद व दिव्यांग मुलीवर पाशवी अत्याचार करून बलात्कार केल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना हिवरखेड येथे घडली आहे.

 

 हिवरखेड येथील भीम नगर परिसरात एक मतिमंद व अपंग मुलगी (वय तीस वर्ष) आपल्या आई वडिल आणि भावा समवेत राहते आणि तिचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात. दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान मतिमंद मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी नराधम गृहरक्षक दलाचा जवान संतोष सिताराम इंगळे राहणार हिवरखेड याने सदर मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची आब्रु लुटली. आणि घटनास्थळावरून पळ काढला.

मुलीचे पालक घरी आल्यावर शेजाऱ्यांमार्फत त्यांना या जघण्य घटनेची माहिती मिळाली. पीडित मुलीला विचारणा केल्यावर तिने सर्व हकीकत पालकांना सांगितली. हिवरखेड पोलीस स्टेशन चा कारभार तेल्हारा पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आल्यामुळे पीडित मुलीसह तिच्या आईने तेल्हारा पोलिस ठाणे गाठून आरोपी गृहरक्षक दलाचा जवान संतोष सिताराम इंगळे याच्या विरोधात फिर्याद दिली

तेल्हारा पोलिसांनी मुलीला वैद्यकीय चाचणी करिता पाठवून तात्काळ आरोपीला अटक केली. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 376 (2), 506 नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home guard brutally tortures mentally retarded and crippled girl in Akola