small girl died : पती-पत्नीच्या भांडणात गेला चिमुकलीचा जीव; बापाने जिवंत पुरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

small girl died in Husband and wife quarrel

पती-पत्नीच्या भांडणात गेला चिमुकलीचा जीव; बापाने जिवंत पुरले

रिसोड (जि. वाशीम) : निर्दयी बापाने एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरले. ही घटना शनिवारी उघडकीस आली. यात चिमुकलीचा मृत्यू (small girl died) झाला. सुरेश प्रभाकर घुगे (२७) असे निर्दयी वडिलाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. (small girl died in Husband and wife quarrel)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश घुगे (रा. रिसोड) हा पत्नी कावेरीसोबत वाडी वाकद शेतशिवारातील कोठ्यावर राहतो. त्याला तीन मुली आहेत. सुरेश हा नेहमी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा. यातून दोघांचे नेहमी भांडण होत होते. तसेच सुरेशला दारूचे व्यसन जडले होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

हेही वाचा: ‘सबको मार डालूंगा’ म्हणणाऱ्या विलासने खरचं केला पत्नी, मुलीचा खून

भांडण (Husband and wife quarrel) सुरू असताना सुरेशने पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी जीव वाचवण्यासाठी गावाकडे धावत गेली व दिराला संपूर्ण माहिती दिली. काही माणसं शेताकडे गेले असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली. सुरेशने स्वतः मुलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याचे (Father buried alive) सांगितले.

प्रेत उकरून काढून याबाबतची सूचना रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर सुरेशला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Husband And Wife Quarrel Small Girl Died Father Buried Alive Crime News Washim District News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :WashimCrime News