नागपुरातील हत्याकांड : ‘सबको मार डालूंगा’ म्हणणाऱ्या विलासने खरचं केला पत्नी, मुलीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सबको मार डालूंगा’ म्हणणाऱ्या विलासने खरचं केला पत्नी, मुलीचा खून

‘सबको मार डालूंगा’ म्हणणाऱ्या विलासने खरचं केला पत्नी, मुलीचा खून

नागपूर : पतीने पत्नी व मुलीचा गळा चिरून हत्या (Murder) केली. यानंतर स्वतः गळफास घेतला. ही धक्कादायक घटना नागपुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत राजीवनगरच्या वानाडोंगरी औद्योगिक वसाहतीमधील सरोदे मोहल्ल्यात घडली. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Murder in Nagpur rural)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास चंपतराव गवते (४०) असे आरोपी मृत पतीचे नाव आहे. तर पत्नी रंजना विलास गवते (३६) व मुलगी अमृता (१०) असे मृतांची नावे आहेत. विलासला तीन मुली होत्या. सर्वांत मोठी मुलगी काजल (१९) हिचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मुलीचे लग्न झाल्यानंतर विलासची चिडचिड (Irritability) वाढली होती. कुणी त्याच्याशी बोलले तरीही ते आपल्याशी भांडत असल्याचे विलासला वाटत होते. त्याच्या याच स्वभावामुळे नागरिकांनी बोलणे बंद केले होते.

हेही वाचा: "देवेंद्र फडणवीस बीकेसी पोलिस ठाण्यात जाणार नाही"

अशा वागण्यामुळे विलास मानसिक रोगी (Mentally ill) असल्याचे सर्वांनाच वाटत होते. तो घरी आई, पत्नी आणि आजूबाजूच्या नागरिकांना शिवीगाळ करीत होता. यामुळेच कुटुंबीयांनी त्याला दोनदा दवाखान्यात नेत मानसिक उपचार सुरू केला होता. तसेच तो ‘सबको मार डालूंगा’ असा म्हणायचा. मात्र, त्याच्या बोलण्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, मुलीच्या लग्नानंतर हा प्रकार वाढतच गेला. या पागलपनातूनच त्याने कुटुंबीयांना संपवल्याची परिसरात चर्चा आहे.

असा घडला हत्याकांड

शुक्रवारी रात्री टीव्ही बघून कुटुंबीय झोपी गेले. पत्नी रंजना जवळ अमृता तर विलास जवळ लहान मुलगा तेजस (१२) झोपला होता. रात्री अकरा ते दोन वाजताच्या सुमारास विलासने सत्तूरने रंजनाचा गळा (Murder) चिरला. तिच्या आवाजाने मुलगी अमृता उठली. ही बाब ती इतरांना सांगेल या भीतीने त्याने अमृताच्या गळाही चिरला. यानंतर दोरीच्या साहाय्याने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

हेही वाचा: ८६ लोकांनी आश्रय घेतलेल्या मारियुपोलमधील मशिदीवर बॉम्ब हल्ला

रात्री उघडकीस आला प्रकार

विलासने पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची घटना रात्री अडीच वाजता उघडकीस आली. यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.

पती-पत्नीचे पटत नव्हते

विलास हा कुठलेच काम करीत नसल्याची माहिती आहे. काही वर्षांपासून तो नेहमीच चिडचिड करीत होता. कुणाशीही भांडण करायचा. घरीही अशाच पद्धतीने वागायचा. आईला शिवीगाळ करायचा. याशिवाय पत्नीवर शंका घ्यायचा. त्यामुळे पती-पत्नीचे पटत नव्हते. मात्र, तो असं काही करेल हे कोणालाही वाटले नव्हते. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Web Title: Murder Irritability Mentally Ill Crime News Nagpur Rural

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..