
आजचे युग स्पर्धेचे आहे. यात वावरताना प्रत्येक गोष्टीची, वस्तूची प्रसिद्धी करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी कामी येते ती जाहिरात! जाहिरात आणि प्रसिद्धीला आज प्रचंड महत्त्व आले आहे. कोणतीही सेवा किंवा उत्पादन विकताना उत्पादकांना/निर्मात्यांना त्याची प्रभावी जाहिरात करणे गरजेचे वाटू लागले आहे. यातूनच अनेकांना जाहिरातीचे जग खुणावू लागले आहे.
अकोला : आजचे युग स्पर्धेचे आहे. यात वावरताना प्रत्येक गोष्टीची, वस्तूची प्रसिद्धी करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी कामी येते ती जाहिरात! जाहिरात आणि प्रसिद्धीला आज प्रचंड महत्त्व आले आहे. कोणतीही सेवा किंवा उत्पादन विकताना उत्पादकांना/निर्मात्यांना त्याची प्रभावी जाहिरात करणे गरजेचे वाटू लागले आहे. यातूनच अनेकांना जाहिरातीचे जग खुणावू लागले आहे. मात्र, असे असले तरी महावितरणने याला वारंवार विरोध केला आहे. बरेचदा आवहन केल्या जाते. प्रसंगी व्यावसायिकास नोटीसही बजावल्या जाते. अकोला येथे महावितरणच्या आवाहनाला तसेच महावितरणने कायदेशीर नोटीस देऊनही महावितरणच्या मालमत्तेवरील देव कमल हॉस्पीटलची जाहिरात फलके न काढल्याने महावितरण शहर विभागाच्यावतीने संबंधित हॉस्पीटलचे डॉ. आशीष तापडीया यांच्यावर शासकीय मालमत्तेचा अवैध वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वीज खांब, रोहित्रे, फीडर पीलर, डी.पी. इत्यादी महावितरणच्या यंत्रणेवर किंवा यंत्रणेच्या अगदी जवळ, खाली अनेक संस्था, व्यावसायीक, जाहिरातदारांनी आपल्या प्रचार प्रसिध्दीसाठी अनाधिकृत फलके, पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग लावले होते. या प्रचार, प्रसिध्दी साहित्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट होणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते. याचा सर्वात मोठा अडथळा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज जाळ्यांची देखभाल दुरूस्ती करताना होत होता, काही ठिकाणी यामुळे अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहे. असे प्रकार टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने अवैधरित्या लावलेली फलके,पोस्टर्स संबंधितांना काढण्याचे आवाहन केले होते. त्यासोबतच संबंधितांना नोटीस सुद्धा बजावली होती. परंतु जठारपेठ रतनलाल प्लॉट रोडवरील महावितरणच्या मालमत्तेवर ‘देवकमल हॉस्पीटलच्या’ जाहिरातीबाबत संबंधित हॉस्पीटल प्रशासनाने महावितरणच्या आवाहनाकडे पुर्णता दुर्लक्ष केल्याने महावितरण प्रशासनाने संबंधित हॉस्पीटलचे डॉ. आशिष तापडीया यांच्यावर विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेच्या विदृपणास प्रतिबंध करण्याकरिता असलेले अधिनियम १९९५ अंतर्गत पोलिस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा यापुढे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तीव्र करण्यात येत असल्याने ज्या जाहिरातदारांनी आपली प्रचार साहित्ये काढली नाही त्यांनी काढून घ्यावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||