अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे तर असा करा अर्ज, सायन्ससाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरू

सुगत खाडे  
Wednesday, 12 August 2020

महानगरातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत सहजरित्या प्रवेश घेता यावा यासाठी अकरावी विज्ञान शाखेची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवार (ता. ११) पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी उपलब्ध संकेतस्थळावर प्रवेश अर्ज २० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करू शकतील.

अकोला   ः महानगरातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत सहजरित्या प्रवेश घेता यावा यासाठी अकरावी विज्ञान शाखेची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवार (ता. ११) पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी उपलब्ध संकेतस्थळावर प्रवेश अर्ज २० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करू शकतील.

दहावीचा निकाल लागण्यानंतर आता विद्यार्थी व त्यांचे पालक महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण विभागाकडून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

example

नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला एकच आवेदन पत्र भरता येणार असल्यामुळे आवेदन पत्र काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या यादीमधून विषय, उपलब्ध जागा, प्रवेश शुल्क याचे व्यवस्थित निरीक्षण करुन विद्यार्थ्यांनी कनिष्ठ प्राधान्यक्रम ठरवावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

example

अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला
अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मार्गदर्शन
अकरावी प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर महानगरातील सर्व विज्ञान महाविद्यालयांची यादी, त्यांची प्रवेश क्षमता तसेच विषयवार वार्षिक फी बाबत माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

काही अपरिहार्य कारणास्तव दुसरा प्रवेश अर्ज भरावयाचा झाल्यास त्यांनी प्रवेश समिती कार्यालय, आगरकर विद्यालय, स्टेशन रोड अकोला दुपारी २ ते ५ यावेळेत भेट द्यावी. त्यासाठी मंगळवारी (ता. १) प्रवेश समितीच्या कार्यालयाचे उद्‍घाटनन उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी समिती सचिव गजानन चौधरी तसेच पदाधिकारी हरिश बुंदेले व साबिर कमाल उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you want to get admission in Akola News XI, do so, start online process for Science