
अकोला : अवैध सावकारांविरोधातील मोहीम सहकार विभागाकडून सुरू असून, गजानन लक्ष्मणराव माकोडे (रा. खतोरेवाडी, रामटेकपुरा, अकोट) यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये धाड टाकण्यात आली. सहाय्यक निबंधक रोहिणी विटणकर यांच्या नेतृत्वाखाली गठित पथकाने ही कारवाई केली. पथकात सहकारी अधिकारी दीपक सिरसाट, डी. डी. गोपनारायण, मुख्य लिपिक डी. बी. बुंदेले, आणि जी. एम. कवळे यांचा समावेश होता.