esakal | बियाणे, खतांची अवैध विक्री, तीन बियाणे परवाने निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

बियाणे, खतांची अवैध विक्री, तीन बियाणे परवाने निलंबित

बियाणे, खतांची अवैध विक्री, तीन बियाणे परवाने निलंबित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः बियाण्यांची अवैध विक्री, साठवणुक, लिंकींग केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील तीन बियाणे परवान्यांचे निलंबन, एक रद्द, सहा जणांना ताकीद तर, एका खत परवान्याचे निलंबन, दोघांना ताकीद देण्याची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिक्षकांच्या सुनवाईदरम्यान करण्यात आली. (Illegal sale of seeds, fertilizers, three seed licenses suspended in Akola)

हेही वाचा: मुकसंमती; आता एचटीबिटी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर


अवैधरित्या बियाणे, खते विक्री, अवैध साठवणूक व शेतकऱ्यांच्या इतर तक्रारींवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विविध कृषी सेवा केंद्रांवर परवाने निलंबन, रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेल्या सुनवाईनुसार दोषी आढळलेल्या तीन कृषी सेवा केंद्रांचे बियाणे परवाने निलंबित, एक रद्द तर, सहा कृषी सेवा केंद्रांना ताकिद देण्यात आली आहे. एक खत परवाणा निलंबित करण्यात आला असून, दोन खत विक्रेत्यांना ताकिद देण्यात आली आहे. त्यामध्ये कपाशीचे बियाणे मुदतीपूर्वी विकल्याप्रकरणी व लिंकींगच्या तक्रारींवरून, अनुदानावरिल बियाणे अवैधरित्या विक्री केल्याप्रकरणी, सोयाबीन बियाणे दुसऱ्या जिल्ह्यात विकल्याप्रकरणी, बियाण्याची जबाबदारी नसल्याचे बिलावर शिक्के मारल्याप्रकरणी व खतांचा जुना साठा केल्याप्रकरणी चार परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

हेही वाचा: Akola; ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार!या कृषी सेवा केंद्रावर कारवाई
तेल्हारा तालुक्यातील गणेश कृषी सेवा केंद्राचा बियाणे परवाना एक महिन्यासाठी, पातून तालुक्यातील आलेगाव येथील अमोल कृषी सेवा कंद्राचा बियाणे परवाना तीन महिन्यासाठी, बार्शीटाकळी येथील गजानन कृपा कृषी सेवा केंद्राचा बियाणे परवाना १५ दिवसांसाठी तर, अकोल्यातील मे प्रकाश ट्रेडिंग कंपनीचा खत परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. तेल्हाऱ्यातील दधीमती कृषी सेवा केंद्राचा बियाणे परवाना रद्द करण्यात आला असून, पुष्कर ॲग्रो एजन्सी तेल्हारा, यश कृषी सेवा केंद्र दानापूर तेल्हारा, सद्‍गुरू कृषी सेवा केंद्र दानापूर तेल्हारा, महालक्ष्मी सिड्स तेल्हारा, सरिता कृषी सेवा केंद्र तेल्हारा, तिरुपती कृषी सेवा केंद्र अकोला, भारत कृषी सेवा केंद्र बाळापूर, अंबिका कृषी सेवा केंद्र बाळापूर यांना ताकिद देण्यात आली आहे.

हेही वाचा: कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?बियाणे, खते विक्री करताना किंवा साठवणूक करताना विक्रेत्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. बियाणे, खतांची कोणत्याही प्रकारचे अवैध विक्री, साठवणूक किंवा फसवणूक आढळल्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर

Illegal sale of seeds, fertilizers, three seed licenses suspended in Akola

loading image