esakal | मुकसंमती; आता एचटीबिटी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर
sakal

बोलून बातमी शोधा

मुकसंमती; आता एचटीबिटी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर

मुकसंमती; आता एचटीबिटी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अडगाव बु. (जि.अकोला) ः शेतकरी संघटनेने सन २०१९ पासून सुरू केलेल्या किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रहाला मोठे स्वरूप देत ता.१० जू ला अडगाव खुर्द येथील शेतात एचटीबिटी बियाणे पेरणी करून ऑनलाईन माहिती केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. (Now HTBT seeds on farmers' bunds)


कृषी विभाग एचटीबिटी बियाणे बेकायदेशीर आहे, याला शासनाची मान्यता नाही असा दावा जरी करीत असेल तरी कृषी विभागाच्या दृष्टिकोनातून शेतकरी संघटनेच्या सुरू असलेल्या बेकायदेशीर आंदोलनात कृषी विभागाची ठोस अशी कोणतीही भूमिका दिसून येत नाही. कृषी विभाग याबाबत डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी संघटनेची भूमिका शेतकरी विरोधी असल्यावरही शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून कार्यरत असलेल्या कृषी विभागाचे अधिकारी काय करीत आहेत, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा: ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार!

राज्य महामार्गावर असलेल्या अडगाव खुर्द येथील कसाईवाडा शेतात खुलेआम एचटीबिटी बियाणे पेरणी करून ऑनलाईन माहिती केंद्राचे उद्‍घाटन केले जाते. कृषी विभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करती नाही हे ही तेवढेच खरे. आता संघटनेच्या वतीने एचटीबिटी बियाणे आंदोलनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना बियाण्याकरिता ऑनलाइन नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात शेतकरी संघटना व्यावसायिकदृष्ट्या न उतरता शेतकरी व बियाणे यातील दुवा म्हणून काम करेल, अशी माहिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष ललीत बहाळे व माहिती तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार यांनी दिली.

हेही वाचा: कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?


जणुकीय अभियांत्रिकीला पर्यावरणाचा विध्वंस करणारे तंत्रज्ञान मानणारे पर्यावरणातीरेकी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मात्र कोविडविरुद्धची लस आनंदाने टोचून घेत आहेत. या लसी जणुकिय अभियांत्रिकीद्वारे ट्रान्सजेनिक बदल घडवून आणलेली उत्पादने आहे. म्हणजे वैद्यक क्षेत्रातील जणुकीय अभियांत्रिकीच्या वापराचे स्वागत करायचे, त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रात होता कामा नये. शेतकरी विरोधी या प्रवृत्तीचा निषेध व्हायला हवा.
- ललीत बहाळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना

हेही वाचा: अकोटात प्रसुती दरम्यान मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

ऑनलाइन माहिती केंद्राचे उद्‍घाटन व प्रतिकात्मक एचटीबिटी बियाणे पेरणी बाबत अडगाव खुर्द येथील शेतातील शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबतचा अहवाल मागितला आहे. तो प्राप्त झाल्यावर निर्णय घेतला जाईल.
- डॉ. कांताआप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक, अकोला

कृषी विभागातर्फे तक्रार मिळाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर फड, ठाणेदार, अकोट ग्रामीण

संपादन - विवेक मेतकर

Now HTBT seeds on farmers' bunds

loading image