esakal | कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?

कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार तेल्हारा तालुक्यात गेल्यावर्षी पासून सुरू आहे. या बोगस बियाण्यामुळे गेल्यावर्षी शेतकरी खल्लास झाला तरी देखील विविध कंपन्यांनी व कृषी व्यवसाईकानी आपल्या फायद्यासाठी यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्याचा सपाटा सुरू केला आहे. (Who will control the arbitrariness of agribusinesses?)


बियाणे जर ठणठणीत आहे तर शेतकऱ्यांच्या बिलावर कशाला तुमच्या जबाबदारीवर बियाणे घेण्याचा शिक्का मारल्या जात आहे. याचाच अर्थ असा आहे की तुमचे बियाणे बोगस आहेत. बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून शेतकऱ्यांच्या खेळ करणे सुरू आहे. तुमच्या जबाबदारीवर बियाणे घ्यावे, असा शिक्का मारण्याचा जो प्रकार तेल्हारा शहरात झाला तो शेतकऱ्यांनी लगेच हाणून पाडला.

हेही वाचा: स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत

वर्षभराची खेप म्हणजे, शेताची पेरणी शेतातून निघणारे उत्पादनावर शेतकऱ्यांचे सर्व काही अवलंबून असते. याच भरोश्यावर शेतकऱ्याचे जीवन मान असते. म्हणून पेरणीकरिता चांगले दर्जेदार बियाणे मिळावे. हा शेतकऱ्यांचा उद्देश असते. शेतातील मशागत पेरणीसाठी शेतकरी पै-पै पैसा गोळा करून पेरणी करतो. पीक उभारणीसाठी शेतकरी कशाचीही पर्वा करीत नाही. परंतु गेल्या वर्षी पासून विविध बियाणे कंपन्यांनी, कृषी व्यवसायिकांनी शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू केला आहे.

हेही वाचा: खरीप तोंडावर अन् बियाण्याची शोधाशोध!

अतिशय बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून आपला ऊल्लू शिधा करण्यात धन्यता मानली जात आहे. गत वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना या बोगस बियाण्यामुळे दुबार तिबार पेरण्या कराव्या लागल्या. तरी देखील उत्पादन झाले नाही. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा देखील उतरविला होता; पण विमा कंपन्यानी हातवर केले. शासनाची मदतही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाला. यावर्षी देखील तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्याचा प्रकार सुरू आहे.

हेही वाचा: ५० गाई फुलवतात १०० एक्कर शेती, दरवर्षी होतंय लाखोंचं उत्पन्न

मागील वर्षीचा वाईट अनुभव पाहता शेतकऱ्यांनी यावर्षी खरेदी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहिले तर केवळ ५५ टक्केच सोयाबीन उगवत असल्याने शेतकऱ्यांनी आता आणलेले बियाणे परत करण्याचा सपाटा लावला आहे. विविध कंपन्यांनी व कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. दुसरीकडे नामांकित बियाण्यासोबत इतर बियाणे घेण्याची सक्ती केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी शेतकरी हाणून पाडीत आहे.

हेही वाचा: शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!कर्जाचा डोंगर
शेतकरी अंगावर कर्जाचा डोंगर उभा करून शेताची पेरणी करतो पीक वाढीसाठी ढोर मेहनत शेतकरी करीत असतो. वाढीसाठी शेतावर पाण्यासारखा पैसा ओततो. पीक येईल ही आशा मनाशी ठेवली जाते; परंतु बोगस बियाण्यापायी शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे.

यंत्रणेला अपयश
बोगस बियाण्याचा प्रकार थांबविण्यास शासकीय यंत्रणेला पूर्ण पणे अपयश आले आहे. शासनाच्या अधिकारी केवळ वेळ मारण्याच धन्यता मानत आहेत बियाणे कंपन्या आणि कृषी व्यवसायिक दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असतानाही शासकीय मंडळी याबाबत गप्प असल्यामुळे कृषी व्यवसायिकांचे मनोधैर्य दिवसेंदिवस वाढत आहे याला आळा घालण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Who will control the arbitrariness of agribusinesses?

loading image
go to top