मित्रा हात सोडू नको... तुझा हात सुटेल तर माझी साथ सुटेल!

मित्रा हात सोडू नको... तुझा हात सुटेल तर माझी साथ सुटेल!
SYSTEM

अमानी (जि. वाशिम) : पांगरी रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. पांगरी नवघरे ते अंमानी गावानजीक असलेला लहान पूल दोन्ही बाजूंनी धरणाचा संगम असल्यामुळे धरणाचे पाणी याच पुलावर येऊन ठेपते. त्यामुळे थोडासाही पाऊस झाला तर पुलाच्या पाण्यामध्ये, प्रवाहामध्ये, उंचीमध्ये वाढ होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना एकमेकांना आधार देऊन पूल पार करावा लागतो. (Increase-the-height-the-bridge-The-question-of-Pangri-road-Citizens-lives-in-danger-Washim-News-nad86)

पांगरी ते अंमानी हा तीन किलोमीटरचा रस्ता आधीच मोंटी कार्लो कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. ३० ते ३५ टनाची ओवरलोड गौण खनिजाची मालवाहतूक करण्यासाठी परवानगी देणाऱ्या संबंधित विभागावर आजपर्यंत कारवाई झाली नाही. त्यातच आज पुलाचाही प्रश्न तेवढाच गंभीर होत आहे.

मित्रा हात सोडू नको... तुझा हात सुटेल तर माझी साथ सुटेल!
वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल

पांगरी ते अंमानी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाल्या जमीनदोस्त झाल्यामुळे त्यातून येणारे सर्व घान सदृश्य पाणी गावात शिरून आधीच गावात घाणीचे साम्राज्य झाले आहे. परत हे पाणी त्यात मिसळत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर होत चालला असून हे पाणी रोडवरून वाहत असल्यामुळे ते रहदारीसही घातक ठरत आहे. हा पूल पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे.

थोडा जरी पाऊस झाला तरी, एकमेकांचा हात धरल्याशिवाय रस्ताच पार करता येत नाही. हात सुटला तर, जीव धोक्यात, ही परिस्थिती आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अभियंता खारोळे यांना विचारणा केली असता, पाच वर्षांपूर्वीचे उत्तर परत दिले जात आहे. संबंधित प्रश्न नाबार्डकडे मांडण्यात आला असून, डागडुजीसाठी २५ लाख रुपयांचा निधी आल्याचे सांगण्यात येते. मात्र, तो खर्च कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Increase-the-height-the-bridge-The-question-of-Pangri-road-Citizens-lives-in-danger-Washim-News-nad86)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com