Independence Day 2023 : स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र टिळक राष्ट्रीय शाळा विस्मृतीत; अनेक घटनांची साक्षीदार ठरलेली संस्था

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सन १९१९ मध्ये ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ ही संस्था अकोल्यातील मोठी उमरी परिसरात स्थापन झाली.
Independence Day 2023
Independence Day 2023 Sakal

अकोला - भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करताना अकोल्यातीलच नव्हे तर वऱ्हाड प्रांतातील स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र राहिलेली ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ विस्मृतीत जात आहे. संस्थेच्या स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय कामगिरीची प्रेरणा येणाऱ्या पिढीला देण्यासाठी हा ठेवा जपण्याची गरज आहे.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सन १९१९ मध्ये ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ ही संस्था अकोल्यातील मोठी उमरी परिसरात स्थापन झाली. सुरुवातीपासूनच स्वातंत्र्य लढ्यातील अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार ही संस्था राहिली आहे.

Independence Day 2023
Independence Day 2023: OTT वरील हे 8 देशभक्तीवरील चित्रपट बघुन स्वातंत्र्यदिन करा साजरा

लोकमान्य टिळकांच्या चुतुःसुत्री व नंतर महात्मा गांधी यांच्या सत्याग्रही विचारांचा मोठा कौशल्याने अंगीकार करून अकोला शहर व जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व या संस्थेच्या माध्यमातून उभे राहिले. सन १९४२ च्या लढ्याचे संस्मरणीय योगदान या संस्थेचे होते.

अकोल्यातील इतिहास अभ्यासक विनायक बोराळे यांनी ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ या संस्थेच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबाबत माहिती देताना सांगितले की, १६ मार्च १९३० रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने दिलेल्या आदेशावरून ‘वऱ्हाड प्रांतिक काँग्रेस कमेटी’चे रुपांतर ‘वऱ्हाड प्रांतिक युद्ध मंडळा’त करण्यात आले होते.

Independence Day 2023
Independence Day : लाल किल्ल्याजवळ पुरण्यात आलेले टाइम कॅप्सूल म्हणजे काय? वर्षानुवर्षे यावर चाललाय वाद

त्यात अमरावती येथील वीर वामनराव जोशी, यवतमाळचे बापूजी अणे, अकोल्याचे दादासाहेब गोळे, दुर्गाताई जोशी, हरिहरराव देशपांडे, ताराबेन मश्रुवाला या अग्रगण्य नेत्यांबरोबर राष्ट्रीय शाळेचे काशिनाथ विठ्ठल सहस्त्रबुद्धे (बापुसाहेब), देविदास एकनाथ देशपांडे, रघुनाथ गणेश पंडित यांचाही या मंडळात समावेश होता.

वऱ्हाड प्रांताचे ब्रिजलाल बियाणी हे धडाडीचे नेते अकोल्यातील होते. त्यामुळे युद्ध मंडळाचे कार्यालयात अकोल्यातच ठेवण्यात आले. अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि बुलडाणा या जिल्ह्याचे कामकाज अकोला येथून चालत होते. कार्यालयाची जबाबदारी संस्थेचे संस्थापक आबासाहेब कुळकर्णी यांच्यावर होती.

Independence Day 2023
Independence Day 2023: स्वातंत्र्यदिन खास बनवायचा आहे ना? मग या टिप्स वापरून मेकअप करून पाहाच!

संस्थेला इंग्रजांनी लावले होते सील

कलकत्ता येथील डमडम तुरुंग फोडून बाहेर पडलेले क्रांतीकारक सीताराम डे, पोलिस पहाऱ्यात रहाणारे पृथ्वीसिंह आझाद, थोर क्रांतीकारक वीर भगतसिंहाचे साथीदार राजगुरू यांना आश्रय देणारी संस्था ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ होती.

कैदी जगत नावाने वृत्तपत्र प्रकाशित करणारे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अकोल्या जवळील दहीहांडा येथे खाऱ्या पाण्याची विहीर शोधून मिठ तयार करीत कायदा मोडळणारे रघुनाथ गणेश पंडित (दादासाहेब), रेल्वे उलथविणयाचा आरोप असणारे मुने गुरूजी अर्थात अनंत हरी क्षीरसागर, तारा तोडणे, दळणवळणाची व्यवस्था भंग करणारे सर्व क्रांतीकारी हे राष्ट्रीय शाळेचे शिक्षक कार्यकर्ते असल्याच्या आरोपातून इंग्रजांनी ३० सप्टेंबर १९४२ रोजी संस्थेला सील लावले होते.

२१ शिक्षकांनी भोगला कारावास

‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ हे त्याकाळी स्वातंत्र्य लढ्याचे अकोल्यातील केंद्र राहिले होते. त्यामुळे वेगवेगळ्या कारवाईत सहभागी असल्याच्या आरोपातून संस्थेच्या २१ शिक्षकांना इंग्रजी राजवाटीत तीन महिन्यापासून ते दोन वर्षांपर्यंतची शिक्षा झाली होती.

काहींना दंडही आकारण्यात आला होता. या काळात इंग्रजांनी संस्थेवर ताबा मिळवून संस्थेच्या चल-अचल संपतीची वाताहात लावली.

Independence Day 2023
Mumbai Traffic News : अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पण लवकरच...

अविस्मरणीय स्मृती जोपासण्यासाठी हवा पुढाकार

‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ ही संस्था अकोल्यातच नव्हे तर तत्काली वऱ्हाड प्रांतातील स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक घटनांची साक्षीदार राहली आहे. त्यासोबतच ज्यांच्या नावे शहीद स्मारक उभारण्यात आले ते कुमार लक्ष्‍मण गोडबोले यांच्या बलीदानाच्या आठवणी देणारी स्मारके आज काळाच्या पडद्या आड जात आहे.

ही स्‍मारके येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे. त्यामुळे या अविस्मरिणीय स्मृती विस्‍मृतीत जाऊ नये म्हणून सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे विनायक बोराळे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com