Independence Day 2023: OTT वरील हे 8 देशभक्तीवरील चित्रपट बघुन स्वातंत्र्यदिन करा साजरा

बॉलिवूडमध्ये दरवर्षी देशभक्तीवर अनेक चित्रपट बनतात.
Independence Day
Independence Daysakal

1947 पासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. बॉलिवूडमध्ये दरवर्षी देशभक्तीवर अनेक चित्रपट बनतात. हे सिनेमे पाहून देशभक्तीची भावना भरून येते. बॉक्स ऑफिसवरही त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ओटीटीच्या युगात आम्ही तुम्हाला अशा देशभक्तीपर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे घरी बसून पाहू शकता.

1. एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने यशाचे झेंडे रोवले आहे. या चित्रपटात दोन क्रांतिकारकांची कथा दाखवण्यात आली आहे. तुम्ही नेटफ्लिक्स, डिजनी प्लस हॉटस्टार आणि झी५ वर पाहू शकता.

Independence Day
Friendship Day 2023 Wishes : मित्रमैत्रिणींना हे खास मेसेज पाठवा, मैत्रीचे नाते होईल अधिक मजबूत

2. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा बायोपिक आहे. देशाचा विश्वासघात केल्याच्या खोट्या आरोपात त्यांना गोवण्यात आले. प्रदीर्घ लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video आणि Voot वर पाहू शकता.

3. आलिया भट्टच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘राझी’. यामध्ये ती अंडरकव्हर रॉ एजंट सेहमत खानची भूमिका साकारली आहे. देशभक्तीचा खरा अर्थ हा चित्रपट शिकवतो. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही राझी पाहू शकता.

4. विक्की कौशल स्टारर सरदार उधम हा आणखी एक उत्तम चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर आहे. चित्रपटाची कथा क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्यावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन शुजित सिरकार यांनी केले आहे.

5. २०२१ मध्ये आलेल्या शेरशाहची कथा कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

Independence Day
Friendship Day 2023: मैत्री असावी तर अशी ! फासावर चढतानासुद्धा मित्रांना मिठी मारण्याची होती शेवटची इच्छा

6. विक्की कौशल स्टारर उरी : द सर्जिकल स्ट्राइक हा खऱ्या घटनांवर आधारित आहे. जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. हा चित्रपट Zee५ वर आहे.

7. शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावरील मेजर चित्रपटात आदिवी शेषाने मुख्य भूमिका साकारली होती. २००८ च्या मुंबई हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

8. परमानु चित्रपटात जॉन अब्राहम, बोमन इराणी आणि डायना पेंटी आहेत. हा चित्रपट १९९८ मध्ये राजस्थानमधील एका गावात भारतीय लष्कराने केलेल्या गुप्त अणुबॉम्ब चाचणीची कथा आहे. हा चित्रपट Netflix आणि Zee५ वर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com