Akola : इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कार्यरत असलेले अकोला येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला; इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस जमादार पदी कर्तव्य बजावत होते
Indian-Tibetan Border Police Force jawan from Akola was cremated with state honors
Indian-Tibetan Border Police Force jawan from Akola was cremated with state honorsSakal

अकोला : आयटीबीपी अर्थात इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कार्यरत असलेले अकोल्यातील रहिवासी नितीन केणे यांच्यावर कौलखेड येथील मोक्षधाम मध्ये शनिवारी सकाळी शासकीय इत्तमामात अंत्यसंस्कार पार पडले. हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी सकाळी त्यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.

श्री गजानन नगरी कौलखेड येथील मूळचे रहिवासी नितीन सुरेश केणे (४०) हे इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस जमादार पदी कर्तव्य बजावत होते. कर्तव्य असताना शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ११ वाजता कौलखेड येथील मोक्षधामध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इत्तमामात अंत्यसंस्कार पार पडले.

भारत माता की जय नितीन केने अमर रहे अशा घोषणा यावेळी उपस्थितांनी दिल्या. यावेळी त्यांना बंदुकीच्या फायरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर असलेला तिरंगा त्यांची पत्नी वैशाली यांच्या सुपुर्द करण्यात आला. यावेळी जवान नितीन केने यांचे नातलग परिसरातील रहिवासी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी नगरसेवक तथा उपमहापौर विनोद मापारी यांच्यासह माजी नगरसेविका पती गणेश पावसाळे, वैकुंठ ढोरे, माझी नगरसेवक संजय बडोने, खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, आदींनी त्यांचा शेवटचा निरोप घेतला. जवान नितीन केणे यांच्या पत्नी ,आई ,भाऊ ,वडील आणि मुलाचा आक्रोश पाहून उपस्थिताचे डोळे पाणावले होते. नितीन केणे यांच्या पश्चात पत्नी , मुलगा ,आई, वडील, भाऊ असा प्राप्त परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com