
अकाेला : वाढत्या तापमानामुळे फुलांचे वाढले भाव
रिसोड : वाढत्या तापमानाचा परिणाम फुल शेतीवरही झाला असून फुलाचे उत्पादन कमी झाल्यामुळे व मागणी वाढल्यामुळे फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत.
मागील काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम फुल शेतीवरही झाला आहे. फुलांचे उत्पादन कमी झाले असून मागणी वाढली असल्यामुळे फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. लग्नसराईत फुलांचे भाव वाढले आहे. सण-उत्सव तसेच विवाह कार्यात फुलांना मोठी मागणी असते यावर्षी दसरा-दिवाळीत फुलांना अल्प भाव मिळाल्यामुळे फूल उत्पादक शेतकरी चिंतेत होता, मात्र लग्न सोहळ्याच्या निमित्ताने फुलांची मागणी वाढली आहे मागणी वाढल्यामुळे परंतु वाढत्या तापमानामुळे फुलाची उत्पादन कमालीचे घटले आहे.
परिणामी फुलांची मागणी वाढली असून फुलांची भावही वाढले आहेत रिसोड तालुक्यात फुल शेती कमी प्रमाणात केली जात असल्यामुळे येथील फुल विक्रेते जालना व नांदेड येथून फुलांची मागणी करून विक्री करतात. मागील दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे याहीवर्षी फुलांची लागवड कमीच आहे .परंतु यावर्षी लग्नसराई जोरात असल्यामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे एकीकडे फुलाचे दर तर वाढतच आहे पण फुला पासून बनवलेले हार आणि गजरे यांना चांगला दर मिळत आहे.
असे आहेत फुलांचे दर
शेवंती १२५ रुपये किलो
मोगरा ६००रुपये किलो
निशिगंध ४०० रुपये किलो
झेंडू १२५ रुपये किलो
गुलाबाचे फुल प्रति नग १० ते १५ रुपये
मी एक एकर शेतावर फुल शेती करतो. मागील दोन वर्षात खर्चही वसूल झाला नाही. या महिन्यात फुलांची मागणी वाढल्यामुळे जालना व नांदेड येथून फुले बोलावून विक्री करत आहे.
-गजानन लिंगे फुलांचे ठोक व किरकोळ विक्रेते रिसोड जिल्हा वाशीम.
Web Title: Inflation Flowers Price Increase Due To Rising Temperatures
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..