अकोट : मृतक खातेदाराच्या पत्नीला विमा संरक्षणाचा आधार

जिल्हा बँकेने दाखविला सामाजिक दायित्वाचा परिचय
Insurance cover for deceased account holder wife
Insurance cover for deceased account holder wife sakal

अकोट : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जि.प. शिक्षक स्व. गजानन विखे यांचा गतवर्षी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्यात कर्ज राशी व जीवन विम्याचे संरक्षणा अंतर्गत बँके द्वारा त्यांच्या पत्नीला विम्याचे रकमेचा धनादेश प्रदान करून त्यांना मोठा आधार देत बँकेने सामाजिक दायित्वाचा परिचय घडविला आहे.

अकोट तालुका सहकारी देखरेख संघाच्या कार्यालयात आयोजित कौटुंबिक कार्यक्रमात जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब हिंगणकर यांचे हस्ते श्रीमती स्वाती गजानन विखे यांना विमा राशीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका भारती गावंडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य व इतर मान्यवर उपस्थित होते. बँक खातेदारांना, त्यांचे ठेवी व कर्जराशीला विम्याचे संरक्षण देण्यासाठी जिल्हा बँकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत विम्याचा प्रिमियम देखील बँकेद्वारा भरला जातो हे विशेष. अकोट शाखेत पगारदार खातेधारक असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक गजानन विखे यांचा दुदैवी मृत्यू झाला.

या योजने अंतर्गत पगारदार शिक्षकांचे वारसाला जीवन विमा संरक्षणाचा मोठा आधार मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकने तत्परतेने कार्यवाही करून स्व.गजानन विखे यांचे वारस पत्नीला लाभ मिळवून दिला. संचालन बँकेचे मार्केटींग आॕफीसर रमाकांत मस्करे यांनी केल, तर आभार शाखाधिकारी आशिष घोम यांनी मानले. जि.प.प्रा.शि.पतसंस्थेचे संचालक अनिल सावरकर, नीलेश काळे, राजेश जाधव, संजय मालोकार, विवेक पाटील, रोषण पाटील, विनायक घनबहादूरकर, कमलेश लहाने, राज गुहे, नितीन म्हैसणे, सचिन खवले, नंदकिशोर गोटे, शंतनू हिंगणकर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तथा शिक्षकवृंद उपस्थित होते.

''जिल्हा बँकेचे ठेवीदार, कर्जदार आणि खातेदारांच्या हित संवर्धनासाठी कटीबद्ध आहे. बँकींग क्षेत्रात असलेल्या स्पर्धेतही जिल्हा बँक बँकींग क्षेत्रात अव्वल आहे. बँकेचे अध्यक्ष डाॕ. संतोष कोरपे यांचे कुशल नेतृत्वाखाली बँकेने राज्यात उत्कृष्ट बँक म्हणून लौकीक प्राप्त केला.''

- नानासाहेब हिंगणकर, ज्येष्ठ संचालक, जिल्हा बँक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com