ग्रामीण भागातील चिमुकल्यांची आंतरराष्ट्रीय झेप! मलेशियात भारताला सुवर्णपदक, ३६ देशांतील स्पर्धकांमध्ये पठकावला प्रथम क्रमांक

Inspirational Rural Education Success India: ग्रामीण विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय यशाची गाथा: मलेशियात सुवर्णपदक
Global Glory for Rural India: Gold Medal Win in Malaysia Competition

Global Glory for Rural India: Gold Medal Win in Malaysia Competition

Sakal

Updated on

अकोला: ग्रामीण विभागातील एका छोट्या गावातील शाळेने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा नावलौकिक वाढवला आहे. मलेशिया येथे आयोजित ‘रोबो वंडर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप वर्ल्ड सबमिट’ या स्पर्धेत तब्बल ३६ देशांतील स्पर्धकांमध्ये भारताने प्रथम स्थानासह सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कामगिरी गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला साध्य झाल्याने देशासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. अशी माहिती शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दि सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या रचना गोरडवार यांनी दिली. यावेळी व्यवस्थापक सुमेर चव्हाण उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com