Akola News : आदर्श कॉलनीतील ‘त्या’ जागेची चौकशी करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court
अकोला : आदर्श कॉलनीतील ‘त्या’ जागेची चौकशी करा!

आदर्श कॉलनीतील ‘त्या’ जागेची चौकशी करा!

अकोला : गौरक्षण रोडवरील आदर्श कॉलनीला लागून असलेल्या जागेची खरेदी करताना मूळ जागेपेक्षा अधिक क्षेत्र दाखवून खरेदी केल्याचा आरोप जागेवर दाव करणारे डॉ.दिनकर शेषराव माहोरे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने ता. ४ जानेवारी २०२२ रोजी खदान पोलिसांना या जागेच्या खरेदीबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही जागा राजीव बियाणी यांच्याकडून कुटुंबातील व्यक्तीच्या नावे खरेदी करून घेणारे शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल

डॉ. माहोरे यांनी न्यायालयात दाखलेल्या याचिकेत दावा केला आहे की, मूळ मालमत्ता पत्रकानुसार आठ हजार ४९३ चौरस फुट जागा असताना वाढीव क्षेत्र दाखवून १५ हजार चौरस फुटाची खरेदी केली आहे. अंदाजे १५ कोटी रुपयांचा भुखंड घोटाळा या खरेदी व्यवहारात झाला असल्याचा दावाही डॉ. माहोरे यांनी केला आहे. राजीव बियाणी यांनी ही जागा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कुटुंबातील सौ. पद्मादेवी गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावे ता. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी यांच्या नावे खरेदी करून दिली. ही खरेदी खोटी असल्याचा आरोप करीत, या खरेदी व्यवहारावर आक्षेप घेत डॉ. माहोरे यांनी दोन वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २०१९ रोजी खदान पोलिस स्टेशन व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कलम २०२ सीआरपीसी नुसार ता. ४ जानेवारी २०२२ रोजी खदान पोलिसांना चौकशी करून ता. ४ फेब्रुवारीपर्यंत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...

डॉ. दिनकर माहोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार न्यायालयाने चौकशी करण्याचे निर्देश दिलेले पत्र खदान पोलिस स्टेशनला ता. २२ जानेवारी रोजी मिळाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही बाजू तपासून घेतल्यानंतर न्यायालयात अहवाल सादर केला जाईल. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा तपास करावयाचा असल्याने अहवाल तयार करण्यास वेळ लागणार आहे.

- श्रीरंग सणस, पोलिस निरीक्षक, खदान पोलिस स्टेशन

गौरक्षण रोडवरील घोडदौड नावाने असलेल्या रस्त्यावरील ४० वर्षे जुनी जागा पद्य प्रतिष्ठाणच्या नावे विकत घेतली आहे. या जागेला लागूनच डॉ. दिनकर माहोरे यांचे घर आहे. त्यांच्या इमारतीचे रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. पश्चिमेकडेही जागा सोडली नाही. त्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे स्वतःची कातडी वाचविण्यासाठी जुना रस्ता, जो काही काळानंतर डिलिट झाला आहे, त्याचा आधार घेवून दिशाभूल केली जात आहे. पोलिसांना चौकशीत माझे सर्व सहकार्य राहील.

- गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार, शिवसेना

Web Title: Investigate That Place Adarsh Colony

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top